Sunday, September 8, 2024
Home मराठी ‘वाळवी’ चित्रपटाला 70 वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

‘वाळवी’ चित्रपटाला 70 वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दरवर्षी विविध भाषिक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नुकतीच ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मयसभा करमणूक मंडळी, झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.

‘वाळवी’ हा शब्द तसा नकारार्थी! तरीही अशा नावाचा आपल्याला हसवणारा आणि अंतर्मुख करणारा भन्नाट चित्रपट फक्त मराठीच नाही तर इतर भाषांमधल्या चित्रपटांमध्ये आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि मांडणीमुळे नेहमीच चर्चेत राहिला. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीला उतरला. परेश मोकाशी नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण, हटके कलीकृती घेऊन येतात, त्यातील वाळवी एक. मराठीतील पहिला थ्रिलकॅाम असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला.

झी स्टुडिओजचे सीबीओ उमेश कृष्ण (कुमार) बन्सल म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी चौकटीबाहेरचे घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असते. परेश मोकाशी अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत, जे प्रेक्षकांच्या आवडी उत्तमरित्या जाणतात. आज ‘वाळवी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. ‘वाळवी’मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सन्मान आहे.”

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ” खूप आनंद आहे, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो आमच्या संपूर्ण टीमचा आहे. मी प्रेक्षकांचाही तितकाच ऋणी आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 12th फेल चा समावेश का नाही ? सोशल मिडीयावर विलक्षण चर्चा…
कोलकत्ता डॉक्टर प्रकरणावर अनुपम खेर यांनी मांडले मत; म्हणाले, ‘त्यांना चौकाचौकात फाशी द्यावी’

हे देखील वाचा