बॉलिवूडमधील ‘चॉकलेट बॉय’ आणि लाखो मुलींच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन. त्याचा फॅन फॉलोविंग खूप असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील त्याचा खूप वावर आहे. त्याची कोणतीही पोस्ट वेगाने व्हायरल होत असते. अशातच वरुण धवनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. पोस्टमध्ये त्याने असे सांगितलं आहे की, त्याच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे.
वरुण धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो एका कुत्र्याच्या पिलासोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वरुण जमिनीवर झोपलेला दिसत आहे आणि त्या छोट्या कुत्र्याच्या पिलासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने त्याचा पाहूना म्हणजेच त्याचा मुलगा म्हणत आहे. यासोबतच त्याने ‘फादरहुड’ असे लिहिले आहे.
त्याने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “फादरहुड मी अजून माझ्या मुलाला नाव नाही देऊ शकलो. कृपया माझी मदत करा.” सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून या पोस्टला ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच सगळेजण त्याला वेगवेगळी नावे सुचवत आहेत.
वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘भेडीया’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात अभिषेक बनर्जी देखील आहे. या सोबतच तो ‘जुग जुग जीओ’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांनी या आधी ‘दिलवाले’ या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानसोबत काम केले आहे
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हरियाणवी क्वीन’च्या ‘५२ गज का दामन’ गाण्याने मोडले सर्व रेकॉर्ड; पार केला १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा
-नादच खुळा! कमाईच्या बाबतीत आमिर खानलाही टक्कर देते पत्नी किरण राव, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
-सनी लिओनी विकणार लॉस एंजेलिसमधील घर? एक एकरात आहेत ६ बेडरूम अन् स्विमिंग पूलसारख्या लग्झरी सुविधा