सध्या प्रादेशिक गाण्यांना सुगीचे दिवस आले आहेत. भोजपुरी गाण्यांसोबतच अनेक हरियाणवी गाणे देखील तुफान गाजत आहेत. अनेक हरियाणवी गायक आणि गायिकांनी त्यांच्या गाण्यांनी हरियाणवी गाण्यांना, संगीताला आणि कलाकारांना जगभरात ओळख मिळवून दिली आहे. याच हरियाणवी गाण्यांसाठी आणि मनोरंजन सृष्टीसाठी खूप अभिमानाची गोष्ट घडली आहे.
हरियाणवी सृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका रेणुका पंवार हिने खूपच कमी वयात मोठे यश संपादन केले आहे. रेणुकाने जे यश मिळवले आहे ते मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. रेणुकाचे सर्वच गाणे प्रेक्षकांना आवडतात. मात्र तिचे ‘५२ गज का दामन’ या गाण्याची बातच निराळी आहे. या गाण्याने लोकप्रियतेचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. हे गाणे यूट्यूबवर आतापर्यंत १०० कोटींपेक्षाही जास्त लोकांनी पाहिले आहे.
या गाण्याने रेणुकाला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. गाण्याला मिळालेल्या १०० कोटी व्ह्यूजबद्दल रेणुकाने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एक खास पोस्ट आणि फोटो शेअर करत रेणुकाने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. तिने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले की, “तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आणि साथीमुळे आपण अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले आहे. मी मनापासून माझ्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करते. माझी टीम माझ्या परिवारासारखी असून, तुम्ही सर्व माझी ताकद आहात. तुम्ही सर्वांनीच हे यश करून दाखवले आहे. ही तर अजून सुरुवात आहे. खूप दूर जायचे आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच ठेवा. धन्यवाद.”
रेणुकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासातच तिच्या या पोस्टला हजारो लाईक्स आणि शुभेच्छांच्या कमेंट आल्या आहेत. रेणुका तिच्या फॅन्समध्ये ‘हरियाणवी क्वीन’ नावाने ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘डीजे पे नाचूंगी’ गाण्याला देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रेणुका पंवार बागपतच्या एका छोट्या गावातून आली आहे. आपल्या दमदार आवाजाने तिने १८ व्या वर्षीच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. रेणुकाची सर्वच गाणे प्रदर्शित झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान चालतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–भन्नाटच! कियारा आडवाणी बनलीय ‘स्टंट गर्ल’, एकाच किकमध्ये उडवली समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी
-कॅन्सर पीडित व्यक्तीने भावुक होऊन धरले थेट सोनू सूदचे पाय, अभिनेत्याने दिली ‘अशी’ रिऍक्शन