Friday, December 1, 2023

मानुषी छिल्लर आणि वरून तेज यांच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, एकदा पाहाच

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता वरुण तेज सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, अभिनेता लवकरच लग्न करणार आहे. पण लग्नाच्या चर्चेदरम्यान, अभिनेत्याचा आगामी एअर फोर्स अॅक्शन चित्रपट ‘ऑपरेशन: व्हॅलेंटाईन’ अचानक चर्चेत आला आहे. ‘ऑपरेशन: व्हॅलेंटाईन’ चर्चेत असण्याचे कारण म्हणजे वरुण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज. होय, वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांनी ‘ऑपरेशन: व्हॅलेंटाइन’चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.

‘ऑपरेशन : व्हॅलेंटाईन’ हा प्रेक्षकांच्या हृदयात देशभक्तीने भरणारा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. असे सांगण्यात येत आहे की वरुण तेज आणि मानुषी छिल्लर अभिनीत हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असेल, ज्याची कथा भारतीय वायुसेनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रित असेल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची उलटी गिनती सुरू होण्यापूर्वी वरुण तेजने त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले आहे. रिलीज झालेल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले. पोस्टरमध्ये हवाई दलाची दोन विमाने समोरासमोर दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना स्टार्सनी लिहिले की, ‘फायनल शोडाऊनसाठी सज्ज व्हा – लढा नुकताच सुरू झाला आहे.’ यासोबत पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘लढाईसाठी सज्ज व्हा.’

नवीन पोस्टरच्या रिलीजसोबतच ‘ऑपरेशन: व्हॅलेंटाइन’ची रिलीज डेटही समोर आली आहे. वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘ऑपरेशन: व्हॅलेंटाइन’ हा वरुण तेजचा पहिला हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये तो भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच मानुषी छिल्लरही रडार ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

IND vs PAK: भारताच्या विजयावर फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी व्यक्त केला आनंद , सोशल मीडियावर टीमचे केले अभिनंदन
‘खतरों के खिलाडी १३’ ला मिळाला त्यांचा विजेता, ट्रॉफी, २० लाख रुपये आणि आलिशान कार या स्पर्धकाच्या हाती

हे देखील वाचा