बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याचा आगामी येणारा चित्रपट वेड मुळे खूपच चर्चेत आहे. वेड चित्रपटाचे गाणे आणि ट्रेलरने प्रेक्षकांना वेडच लावलं आहे. या चित्रपटामध्ये जिनेलिया देशमुख आणि रितेश पन्हा एकदा एकत्र पाहायाला मिळणार आहे. 20 वर्षाच्या कारकिर्दीनंतर रितेश एक वेगळ्या भूमिकेत पाहायाला मिळणार आहे. म्हणजेच वेड चित्रपाटचं दिग्दर्शन स्वत: रितेश करत आहे. त्यामुळे अनेकांनी रितेशचे कौतुकही केले आहे. नुकतंच या चित्रपटचं प्रिमिअर पार पडलं आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी अभिनेता जितेंद्र जोशी यांनी वेड चित्रपटाबद्दल आपले मत सांगितले आहे.
लोकप्रिय जोडी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे पावरफुल कपल पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वेड (Ved) चित्रपटामध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहूण चाहते थक्क झाले आहेत. नुकतंच वेड चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा पार पडला असून यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) ने आपल्या अधिकृत इस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करत वेड चित्रपट पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया शेअर करत लिहिले आहे की,
“आज वेड चित्रपट पाहिला आणि वेड लागलं!!
रितेश भाउंचं दिग्दर्शनात पदार्पण होतंय परंतु आपला 50 वा चित्रपट करावा या सफाईने आणि बारकाव्या ने त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि अभिनय सर्वोत्तम केलाय. जेनीलिया देशमुख यांच्या कडून त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम काम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शुभंकर तावडे च्या प्रामाणिक कामाला तोड नाही. रवी राज ने त्याच्या पहिल्याच सिनेमात साकारलेला खलनायक अप्रतिम . जिया शंकर सुद्धा उत्तम परंतु या चित्रपटात असलेल्या खुशी नावाच्या अगदी नावाप्रमाणेच असलेल्या चिमुरडी ने मला खरोखर वेड लावलं. बाकी अशोक मामांविषयी मी काय बोलू? ते करू शकत नाहीत असा कुठलाही रोल नाही. या वयात, इतके सिनेमे केल्यानंतर देखील मला थक्क करून सोडलं त्यांनी!!
आमच्या प्राजक्त देशमुख या वेड्या लेखकाचे संवाद जेनेलिया देशमुखयांच्या डोळ्यां इतके, रितेश भाऊंच्या प्रामाणिकपणा इतके आणि अशोक मामांच्या अभिनयाच्या प्रेमा इतकेच बोलके आहेत. अजय अतुल हे मराठी मनाला पडलेलं अभूतपूर्व स्वप्न आहे जे त्यांच्याच सुरां मार्फत आपण बघत राहतो आणि त्याला रितेश भाऊंनी बोलकं केलं आहे.
सौरभ भालेराव चं पार्श्वसंगीत सिनेमाचा आत्मा आहे.
रोहन मापुस्कर या ही casting साठी तुझे आभार.
वेड चित्रपटाने मराठी सिनेमाला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होऊन हाऊसफुल्ल चे बोर्ड लागतील अशी आशा आहे. मराठी सिनेमा सर्वार्थाने मोठा करण्याची किमया फक्त प्रेक्षकांच्या हाती आहे आणि यंदा ही ते होईल अशी अपेक्षा.
भाऊ तुम्ही कडक फिल्म बनवली. आता थांबू नका!!
Love you❤️
View this post on Instagram
तब्बल 20 वर्षाच्या कारकिर्दीनंतर रितेश एका नवीन अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. वेड चित्रपटामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन स्वत: रितेशने केलं आहे. त्याशिवाय 10 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर जिनेलिया देखिल मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पुन्हा पदार्पण करत आहे. प्रेक्षकांची ही फेवरेट जोडी चाहत्यांना वेड लावत आहे. जिनेलियाने हिंदी शिवाय तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषांमध्ये काम केले आहे. वेड चित्रपटाच्या गाण्यांनी चाहत्यांमध्ये वेड चित्रपटासाठी क्रेज निर्माण झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘हे तुमचे नेता आहेत का?’ राहुल गांधीना ट्रोल केल्यावर उर्फीने भाजप नेत्याची घेतली शाळा
अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न