Friday, April 26, 2024

सोपा नव्हता रमेश देव यांचा सिनेप्रवास, वाचाल तर थक्क व्हाल

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन (Ramesh Deo is no more) झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. 30जानेवारीला रमेश देव यांनी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला. रमेश देव हे खासकरून त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जायचे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी बहुतकरून नकारत्मक भूमिका अगदी प्रभावी पद्धतीने पडद्यावर साकारल्या. रमेश देव नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर यायचे ते सळसळते उत्साह, अमाप आनंद आणि जगण्याची उमेद असणारे खुशमिसाज व्यक्तिमत्व.

देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठं योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते.

गेल्या अनेक दशकांपासून मनोरंजनविश्वात काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रमेश देव यांनी 1951 साली आलेल्या ‘पाटलाची पोर’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. या सिनेमात त्याची भूमिका छोटी असली तरी लक्षात राहण्यासारखी होती. पुढे 1956 साली आलेल्या राजा परांजपे यांच्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच मुख्य खलनायक रंगवला. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचा अविरत प्रवास सुरु झाला. पुढे त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या 1962 साली आलेल्या ‘आरती’ या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आदी अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका साकारल्या, त्यांचा हिंदीमधील ‘आनंद’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमातील रमेश देव यांनी साकारलेली डॉ. प्रकाश कुलकर्णी ही भूमिका प्रचंड गाजली.

रमेश देव यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत 300 हिंदी सिनेमे, 200 मराठी सिनेमे, 40 च्या आसपास नाटकं शिवाय काही हिंदी, मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. आज़ाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इण्डिया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इलज़ाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशान्ति, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हीरालाल पन्नालाल, यही है जिंदगी, फकीरा, आखिरी दांव, सुनहरा संसार, ज़मीर, एक महल हो सपनों का, सलाखें, 36 घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज़, कसौटी, जैसे को तैसा, ज़मीन आसमान, जोरू का गुलाम, बंसी बिरजू, यह गुलिस्ताँ हमारा, हलचल, मेरे अपने, संजोग, बनफूल, आनंद, दर्पण, खिलौना, जीवन मृत्यु, शिकार, सरस्वतीचंद्र, मेहरबाँन, पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, आदी अनेक गाजलेल्या या सिनेमांमध्ये काम केले.

1962मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळीच दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. नंतर कशाचाही उशीर न करता त्यांनी लगेच लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनव असे दोन मुलं आहेत. या रिअल-लाइफ कपलने तब्बल 73 चित्रपटांमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. रमेश देव यांनी ‘या सुखांनो या’ हे आत्मचरित्र देखील लिहिले होते. रमेश देव यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.(veteran actor ramesh deo passes away)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

सुष्मिता सेनचा डॅशिंग लूक! एका हातामध्ये सिगारेट आणि दुसऱ्यामध्ये बंदुक,पाहिलात का आर्या 3 चा ट्रेलर?

हे देखील वाचा