Sunday, May 19, 2024

विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा, श्रद्धांजली सभेदिवशीच नविन गाणं प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीमधील दिवंगत दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रपट कलाकारांची संस्था सिन्टाने बुधवार (दि, 21 डिसेंबर) रोजी संध्याकाळी मुंबईमध्ये एक प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये गोखलेंचा शेवटचा चित्रपट ‘जगजीवन की पत्नी का तीसरा प्यार’ यामधील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी (दि, 26 नोव्हेंबर) रोजी जगाला राम राम ठोकला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पैनोरमा म्यिजिक कंपनीने त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जगजीवन की पत्नी का तीसरा प्यार’ मधील नवीन गाणं प्रदर्शित केलं आहे. यामध्ये विक्रम गोखले सोबत प्रसिद्ध अभिनेत्री रेवती (Reavati) पाहायला मिळत आहे.

या चित्रपटामध्ये गोखले आणि रेवती वृद्ध जोडप्याची भुमिका साकारत असून जिव्हाळ्याचे नाते पडद्यावर अतिशय अनोख्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. ‘तू अब आया’ या चित्रपटाचं पहिलं गाणं खुद्द दिग्दर्शक राजेश बच्चन (Rajesh Bacchan) यांनीच सुंदर लिहिले आहे तर संगीतकार संजय दाऊ (Sanjay Dau) आणि अंबर दास (Ambar Das) यांनी संगीत दिले आहे. हे गाणं संगीतकार आणि गायक अंबर दास यांनी गायले आहे.

‘जगजीवन की पत्नी का तीसरा प्यार’ हा चित्रपटाची कथा विक्रम गोखले आणि रेवती यांच्या जिवनाशीच निगडीत असून, ज्यांनी पाच दशकापूर्वी एकमेकांसोबत सात फेरे घेतले होते. दोघंही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये खुशहाल आयुष्य जगत होते. मात्र, सुरुची डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश आजारामुळे दोघांच्या चांगल्या आयुष्यामध्ये अडचनी टाकत असून हळू हळू सुरुला तिच्या पतीपासून लांब घेऊन जाते. सुरु गेल्यानंतर जगजीवनच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट राहते ती म्हणजे सुरुच्या चेहऱ्यावर हासू आनने म्हणजे दोघंही आनंदाने एकमेकांसेबत आयुष्य जागू शकते.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीतकार राजेश बच्चन यांनी सांगितले की, “चित्रपटातील ‘तू अब आया’ या गाण्यात स्मृतीभ्रंशाचा परिणाम दाखवण्यात आला आहे, जो लोकांच्या झपाट्याने पकड घेत आहे. जगजीवन आणि सुरुची ही अनोखी प्रेमकथा लोकांच्या हृदयाला भिडणार आहे हे मला माहीत आहे.” पॅनोरमा म्युझिकचे सीईओ राजेश मेनन म्हणाले, “हा चित्रपट देशातील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक विक्रम गोखले यांना आमची श्रद्धांजली असेल, जे नुकतेच आम्हाला सोडून गेले.”

हे गाणं प्रदर्शित करण्याच्या मागचा हेतू म्हणजे विक्रम गोखले यांना पैनोरमा म्यिजिक कंपनीने आदरांजली देत आणि त्याच्या आठवणिंना उजाळा देत हे गाणं प्रदर्शित केलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण
‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य

हे देखील वाचा