Thursday, March 28, 2024

रिचा चड्ढाच्या ट्वीटने पेटला वाद, काही कलाकारांनी लावली फटकार तर ‘या’ अभिनेत्याने दिली साथ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा ही काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नामुळे अनेक लोकांच्या नजरेत आली होती. सध्या ती तिने केलेल्या चुकीमुळे खूपच चर्चेत आली आहे. तिने काही हिवसांपूर्वी भारतीय सेना कमांडर लेफ्टीनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या एका ट्वीटला रिट्वीट करत गलवान घाटीचे नाव मध्ये काढल्यामुळे ती वादाच्या घेऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रवर सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय अभिनेत्रीने माफी देखिल मागितली आहे. मात्र, तरीही वाद काही थांबण्याचे नावच घेत नाही. रिचाला काही कलाकार पाठिंबा देत आहेत तर काही तिच्या विरोधात उभे झाले आहेत.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने देखिल रिचा चढ्ढा (Richa Chaddha) हिने केलेल्या रिट्वीवटवर असहमत आहे. त्यानेदेखिल रिचाने शेअर केलेल्या ट्वीटचा स्क्रानशॉट काढून आपले मत व्यक्त करत ट्वीट शेअर केले आहे. त्याने लिहिले की, “हे पाहून मला वाईट वाटतंय. आपल्या सशस्त्र दलांबद्दलचे उपकार कधीही विसरता कामा नये. ते आहेत म्हणून आज आपण आहोत.”

अनुपम खेर
दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) हे सतत देशताील घडामोडींवर आपले मत व्यक्त करत असतात. त्यांनी देखिल रिचाने केलेल्या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अभिनेत्रीला फटकार लावत लिहिले की, “देशाबद्दल वाईट गोष्टी बोलून चर्चेत येण्याचा प्रयत्न करणे हे कायर आणि छोट्या लोकांचे काम आहे. लष्कराची इज्जत पणाला लावणे… यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते.”

प्रकाश राज
साउथ आणि बॉलिवूड सुपरस्टारर अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हे सतत आपल्या वक्तव्यासाठी ओळखले जातात. मात्र, यावेळेस त्यांनी रिचाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “अक्षय कुमार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती… रिचा चढ्ढा तुमच्यापेक्षा आमच्या देशासाठी अधिक समर्पक आहेत. या पूर्वीही प्रकाश राज यांनी रिचाला पाठिंबा देत ट्विट करत लिहिले की, ‘आम्ही रिचा चढ्ढा तुझ्यासोबत आहोत. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आम्हाला माहीत आहे.”

गजेंद्र चौहान
महाभारत फेम गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये सहाकलाकर भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी देखिल रिचावर निशाना साधत सरळ लिहिले की, “कोण आहे रिचा चढ्ढा? आपल्या वीरांचा अपमान करण्याचा दयनीय प्रयत्न…. त्यांना लाज वाटावी.”

अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या एका ट्वीटच्या चुकीमुळे तिला अनेक कलाकारांनी धरेवर धरले आहे. तिनी सैनिकांची माफी मागितली तरीही तिचा वाद काही थाबण्याला तयारच नाही. मात्र, काही कलाकार तिला पाठिंबा देखिल देत आहेत. आता हा वाद कुठे जाऊन थांबेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांनी का नोंदवला ‘पर्सनॅलिटी राईटस् कायदा?’ जाणू घ्या एका क्लीकवर
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार!’, दिग्गज अभिनेता प्रशांत दामलेंनी शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा