Tuesday, June 25, 2024

प्रसिद्ध आणि दिग्गज हॉलिवूड अभिनेत्री स्टेला स्टीवंस यांचे दुःखद निधन

हॉलिवूड सिनेजगतातील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री स्टेला स्टीवंस यांचे १७ फेब्रुवारी रोजी लास एंजेलिसमध्ये दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या. स्टेला स्टीवंस यांचा मुलगा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता एंड्रयू स्टीवंसने त्यांच्या निधनाचे वृत्त मीडियाला दिले आहे. तत्पूर्वी स्टेला स्टीवंस या अल्जाइमर या आजाराने ग्रस्त होत्या. याच आजारामुळे त्यांचे निधन झाले. स्टेला स्टीवंस यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण असून, अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहे.

स्टेला स्टीवंस यांची मैत्रीण आणि मॅनेजर असलेल्या मारिया कैलाबेरी यांनी स्टेला यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटले, “स्टेला यांच्यासोबत काम करणे खूपच आनंदाची, सन्मानाची आणि सौभाग्याची बाब होती. त्या सर्वात अद्भुत आणि प्रतिभाशाली लोकांपैकी एक होत्या.” तर ब्रूस कुलिक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेला यांच्या निधनाबद्दल सांगताना लिहिले, “महान आणि दिग्गज अभिनेत्री आणि माझ्या भावाची पत्नी असलेल्या स्टेला स्टीवंस यांचे आज मोठ्या आजारानंतर निधन झाले आहे. अखेर आज ती बॉबीला पुन्हा भेटली. त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे मला खूप आवडले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखणे खूपच खास होते.

स्टेला स्टीवंस यांनी चित्रपटांसोबतच अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी ‘मर्डर शी वॉट्ट एंड मैग्नम’, ‘पी.आई.’ आदी सिरीजमध्ये उत्तम काम केले. स्टेला स्टीवंस यांनी केवळ वयाच्या १६ व्या वर्षी इलेक्ट्रीशियन नोबल हरमन स्टीवंस यांच्याशी लग्न केले. दोघांना एक मुलगा देखील झाला. त्याचे नाव एंड्रयू आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि मॉडेलिंग, अभिनय करणे सुरु केले. स्टेला स्टीवंस यांनी १९५९ साली ‘वन फॉर मी’ मध्ये कोरस मुलीच्या रूपात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांनी गोल्डन ग्लोब हा पुरस्कार देखील जिंकला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास

हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा