भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. लतादिंदीच्या निधनाची बातमी समोर येताच देशाचा अलौकिक स्वर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्व पोरके झाले असून विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रियांचा ओघ पाहता सोशल मीडियावर शोकसंदेशाचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. राजकीय क्षेत्रातूनही लता मंगेशकर यांना शब्दरुपाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
महान पार्श्व गायिका भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन देश के हर घर और भारत के तटों से परे एक दुखद खबर है। लता जी का संगीत क्षेत्र, भाषा और समय की सीमाओं को पार कर गया। इसमें सर्वशक्तिमान ईश्वर का आह्वान करने की क्षमता थी। (१/२)
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) February 6, 2022
“लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
“जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” – खासदार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मेरी आवाज ही पहचान है…#LataDidi #LataMangeshkar pic.twitter.com/IA65Fu07Zi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे. – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे – मंत्री अशोक चव्हाण
लतादीदींच्या आवाजाने मागील तीन पिढ्या मंत्रमुग्ध झालेल्या आहेत. पुढेही अनेक पिढ्यांपर्यंत त्यांचा आवाज कायम गुंजणार आहे. त्यांची अनेक गाणी अजरामर राहणार आहेत.#LataMangeshkar pic.twitter.com/93NixMPyL0
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 6, 2022
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे. – मंत्री जयंत पाटील
लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले आहे.लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध pic.twitter.com/ZwrGfPpujq
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 6, 2022
लता दीदी नावाच्या युगाचा अंत झाला, जगाच्या पटलावर हिंदुस्थानचे वैभव लता दीदी होत्या
लता दिदींचे जाणे अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे, आता केवळ लता दिदींच्या आवाजा सोबत राहावे लागेल- विरोधी पक्षनेते विधानपरिषद प्रवीण दरेकर
जिंदगी प्यार का गीत है,म्हणत हजारो गीतांना आपला सुमधुर आवाज देणाऱ्या,देशाचा आवाज म्हणून ओळख असणाऱ्या भारतरत्न लता दीदी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. दीदींनी अजरामर केलेला संगीताचा अनमोल ठेवा माझ्यासह कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.भावपूर्ण श्रद्धांजली – मंत्री धनंजय मुंडे
लतादीदींच्या निधनाने संगीत क्षेत्रासह देशाचे मोठे नुकसान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अगर तुम ना होते…. हम सुरों के मायने खोते …श्रद्धांजली ,-आदरांजली.. कोणतेही अलंकार या सात्विकते ला आवश्यक नव्हते … दैवी सुर आणि स्वर यांना अखेरचा दंडवत .. pic.twitter.com/Z34XRVfkzQ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 6, 2022
लतादादींची गाणी भविष्यात ही चाहत्यांना आनंद देत राहतील व त्या आपल्या गायनाने सर्वांच्या आठवणीत चिरकाल राहतील.
लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 6, 2022
स्वर सम्राज्ञी लता दिदींचा आवाज अनंत काळासाठी भारताची ओळख म्हणून जगभरात अजरामर राहील. आज स्वर्गाच्या दारात लता दीदींची देवी सरस्वतींसोबत अशाच प्रकारे भेट झाली असणार !
भावपूर्ण श्रद्धांजली !#LataMangeshkar pic.twitter.com/0QdKEalei8— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 6, 2022
अपनी सुरीली आवाज से देश-दुनिया पर दशकों तक राज करने वाली 'भारत रत्न' से अलंकृत, स्वर कोकिला लता मंगेशकर जी के निधन का समाचार पाकर संज्ञाहीन हो गया हूँ। उनके निधन से कर्णप्रिय संगीत के एक युग का अंत हो चला है। उन्हे भावपूर्ण श्रद्धांजलि। pic.twitter.com/MQYXlIOn8A
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 6, 2022
हेही वाचा – Lata Mangeshkar | लतादिदींनी बॉलिवूडसाठी गायलेली ‘ही’ हिंदी गाणी चंद्र-सुर्यासारखी राहतील अमर, पाहा यादी
तब्बल महिन्याभरापासून सुरु होते उपचार…
दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून (Corona) बऱ्या झाल्या होत्या. (Lata Mangeshkar Cororna Positive) तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.
दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा – Ventilator) ठेवले. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Singer Bharat Ratna Lata Mangeshkar Passes Away)
हेही वाचा – भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’
लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…
मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.
अधिक वाचा –