प्रसिद्ध तेलुगू अभिनेते बालैय्या (Balayya) यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटांतील त्यांच्या निरनिराळ्या भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी काही काळ रंगभूमीवरही काम केले. त्यांच्या निधनानंतर अनेक टॉलिवूड सेलिब्रिटी दिवंगत अभिनेत्याबद्दल शोक व्यक्त करत आहेत. अभिनेते आणि आमदार नंदामुरी बालकृष्ण यांनीही एक नोट लिहून बालैय्या यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
३५० हून अधिक चित्रपटांमध्ये केला अभिनय
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील बालैय्या यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. १९५८ मध्ये आलेल्या ‘एट्टुकू पै एट्टू’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. एनटी रामाराव, नागेश्वर राव आणि इतर अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी अभिनय केला. ‘पार्वती कल्याणम’, ‘भाग्यदेवता’, ‘कुमकुम रेखा’, ‘कृष्णा कुमारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. (veteran telugu actor balayya has died at 94 years old)
Actor, MLA #NandamuriBalakrishna expressed his deepest condolences on the sudden demise of Veteran actor Shri #Balayya garu. pic.twitter.com/zdmHeBA143
— VamsiShekar ON DUTY (@UrsVamsiShekar) April 9, 2022
चित्रपटांची निर्मितीही केली
अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये ‘चेलेली कपूरम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला नंदी पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांनी ‘नेरमु-शिक्षा’, ‘अन्नथम्मुल्लकधा’, ‘निजाम चेपिथे नेरमा’ चित्रपटांची निर्मिती केली. इतकेच नव्हे, तर काही चित्रपटांचे ते दिग्दर्शकही होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा