अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल ७ ते १० डिसेंबर दरम्यान सवाई माधोपूर (राजस्थान) येथील सिक्स सेन्स फोर्ट अँड रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये जोर धरून आहेत. या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे, पण आतापर्यंत दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण नुकतेच सवाई माधोपूरच्या जिल्हाधिकार्यांच्या व्हायरल झालेल्या पत्रामुळे दोघांचे लग्न होणार असल्याची पुष्टी झाली आहे.
शिवाय आतापर्यंत दोघांच्या काही जवळच्या सहकलाकारांनी या लग्नाबाबत वक्तव्य करून, नकळत त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यापैकी एक म्हणजे कॉमेडियन कृष्णा अभिषेक. कृष्णा अभिषेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विकी आणि कॅटरिना लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. कृष्णा अभिषेक म्हणाला की, “कॅटरिना खूप चांगली व्यक्ती आहे. मी तिच्यासोबत काम केले आहे आणि ती अनेक वेळा शो (द कपिल शर्मा शो) मध्ये पाहुणी म्हणून आली आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. माझा विश्वास आहे की, ती जितकी सुंदर आहे तितकेच तिचे हृदय देखील सुंदर आहे. मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो.” (vicky kaushal katrina kaif wedding krushna abhishek leaked inside details)
त्याचवेळी कृष्णाने लग्नाच्या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, “हो, त्यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे, पण अत्यंत गुप्त पद्धतीने.” तसेच या लग्नात काही निवडक लोकांना बोलावण्यात आले आहे आणि त्यापैकी बहुतेक दोघांचे कुटुंबीय आहेत. याशिवाय लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी अनेक प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.
लवकरच येऊ शकतात लग्नाचे फोटो समोर
त्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहेत का? आतापर्यंत याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ अनेक अवॉर्ड शोमध्ये एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा