Tuesday, June 18, 2024

‘राम सिया राम’मधील जानकी-राघवच्या भावनिक प्रेमकथेने चाहत्यांची जिंकली मने, आदिपुरुषच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

साऊथ सुपरस्टार प्रभासचा चित्रपट ‘आदिपुरुष’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता या चित्रपटाची गाणी एकामागून एक रिलीज होत आहेत. चित्रपटातील नवीन गाणे ‘राम सिया राम’ रिलीज झाले आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉन राम आणि सीतेच्या भूमिकेत रोमान्स करताना दिसत आहेत. यासोबतच ते दोघे विभक्त होताना दाखवले आहेत. ही भावना तुम्हालाही भावुक करेल अशी आहे.

आदिपुरुष (Adipurush) चित्रपटातील राम सिया राम (Ram Siya Ram) या नवीन गाण्याचा व्हिडिओ टी-सीरीजने शेअर केला आहे. सुमारे 3 मिनिटांच्या या गाण्यात प्रभास आणि क्रिती त्यांच्या रोमान्सने प्रभावित करताना दिसत आहेत. गाण्यातील अनेक सीन्स तुम्हाला भावूक करणार आहेत. या गाण्यात सिया-रामच्या रोमान्सशिवाय त्यांच वेगळे होण आणि सीतेला रावणापासून सोडवण्याच्या तयारीत असलेल्या रामाचे दृश्य दाखवण्यात आले आहे.

प्रभास आणि क्रितीच्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा त्यादरम्यान बराच गदारोळ झाला होता. पण ट्रेलरमध्ये काही सकारात्मक बदल करण्यात आले जे चाहत्यांनाही आवडले आहेत. आता या चित्रपटाची गाणीही रिलीज होऊ लागली आहेत. चित्रपटाचे हे नवीन गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याला एका तासात 1.5 मिलियनहून आधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. चाहते या गाण्याच्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट करत आहेत. हे गाणे हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याबद्दल लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.

ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. ‘आदिपुरुष’ 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 600 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनला असून निर्मात्यांना याविषयी खूप आशा आहेत. (Video of Adipurush’s new song goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल

 

हे देखील वाचा