Wednesday, June 26, 2024

लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक सराफ ढसाढसा रडले ; पाहा व्हिडिओ

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे नवाजलेले कलाकार आहेत, त्यांना मनोरंजन विश्वात ‘मामा’ म्हणून ओळखले जाते. मराठी मनोरंजनविश्वातील खरे कोहिनुर म्हणून जे नावं घेतले जाते ते म्हणजे अशोक सराफ यांच होय. अशोक सराफ यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी सिने सृष्टीत नाव कमवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. अनेकदा काम करताना अशोक सराफ यांना छोटे मोठे अनुभव आले आहेत. सध्या अशोक सराफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिययावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या मनाला भावुक करणारा क्षण घडला आहे. अशोक सराफ (Ashok Saraf Videos) यांनी मंचावर एंड्री केली आणि सिंहासनावर बसवले. त्यावेळी लिटिल चॅम्प्सनी त्यांच्यावर फुलं उधळली आणि सर्वांनी त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांचा आशिर्वाद घेतला. प्रत्येकाने अशोकमामांच्या पायावर डोकं ठेवलं. लिटील चॅम्प्सचं प्रेम बघून अशोक सराफ यांच्या डोळ्यात पाणी आलं.

अशोक सराफ यांच्या विषयी बोलायचं झालं तर, चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या अशोक सराफ यांनी 1969 सालापासून 250पेक्षा जास्त मराठी सिनेमांत ते झळकले आहे. यातील 100 सिनेमे हे कर्मशिअल हिट्स आहेत.

 अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गम्मत जम्मत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘धुम धडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘बिन कामाचा नवरा’ आणि ‘एका पेक्षा एक’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांची नावे घेतली जातात. या चित्रपटातून त्यांनी स्वत: ला सिद्ध करून दाखवले आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. (Video of Ashok Saraf crying on Little Champs stage goes viral)

अधिक वाचा-
‘हम तो दिवाने’चा टीझर रिलीझ, उर्वशी रौतेलाचा अन् एल्विश यादवच्या रोमान्सने तोडल्या सगळ्या मर्यादा
‘वेलकम 3’ चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी खूप…’

हे देखील वाचा