Saturday, June 29, 2024

‘लागीरं झालं जी’फेम अभिनेत्रीच्या बोल्ड लूकने वेधलं लक्ष; स्विमिंगपूलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया हे सध्या सर्वांसाठीच एक हक्काचे असे व्यसपीठ तयार झाले आहे. अनेक कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून चाहत्यांंशी कनेक्ट राहत असतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीरं झालं जी’मधील जयडी म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्वा शिंदे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती स्विमिंगपूलमधील सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पूर्वा स्विमसूट परिधान करून स्विमिंगपूलमध्ये पोहताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मुझमे नयी बात है, नए आदतों के साथ है” पूर्वाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. तर काही चाहत्यांनी तिच्या स्विमसूटच्या स्टाइलची प्रशंसा केली आहे.

या व्हिडीओत पूर्वा ही अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर पोहोण्याचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “हॉलीवूड चित्रपटाची नायिका आहे का?” दुसऱ्याने लिहिले की, “पाण्यात आग लावलीस” तर काही चाहत्यांनी तिच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

पूर्वा शिंदेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, पूर्वा हिने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. पूर्वा हिने ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील जयडीच्या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तिला ‘झी मराठी उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिला ‘मटा सनई’ पुरस्कारही मिळाला.पूर्वा हिने तिच्या अभिनय कारकिर्दीत खूप मोठे यश मिळवले आहे. (Video of Lagiram Jala G fame actress Purva Shinde in swimming pool goes viral)

आधिक वाचा-
सर्वांच्या लाडक्या पूजा-वैभवचा ‘एक लाजरा नं साजरा मुखडा…’ गाण्यावरचा रोमँटिक डान्स पाहिला का? व्हिडिओ व्हायरल
‘मला भेट असे मेसेज एक मुलगा सतत करायचा आणि…,’ जाणून घ्या रितिका श्रोत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा