Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऑस्कर कमिटीमध्ये ‘शेरनी’ फेम विद्या बालनचा समावेश; अकॅडमीकडून ३९५ लोकांची यादी जाहीर

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक पुरस्कार असतात, पण ‘ऑस्कर’ हा त्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मनाला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती देखील तेवढ्याच खास असतात. अशातच ऑस्करकडून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा खास गौरव करण्यात आला आहे. तिला ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स’ आणि सायन्सेसने त्यांच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. विद्यासोबत या बॉडीमध्ये सामील होण्यासाठी निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांना देखील निमंत्रण पाठवले आहे. या वर्षी या अकॅडमीमधून जगभरातील 395 कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीसोबत जोडलेल्या लोकांना निमंत्रण दिले आहे. (Vidya Balan, ekta kapoor member of Oscar commitee 395 people’s list ready)

‘शेरनी’ फेम अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला गव्हर्निंग बॉडीचे सदस्य बनण्यासाठी आमंत्रण आले आहे. ती आता गव्हर्निंग बॉडीचा भाग असणार आहे. आता तिला अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटाबाबत मत मांडण्याचा अधिकार असणार आहे. खास गोष्ट म्हणजे हॉलिवूडमधील वॅनिसा किर्बी, लावेरने कॉक्स, रॉबर्ट पॅटिन्सन यांसारख्या कलाकारांची नावे सामील आहेत.

ऑस्करसाठी चित्रपटांना वोटिंग करण्यासाठी तयार केलेल्या 2021 च्या पूर्ण यादीमध्ये 50 देशातील वेगवेगळ्या लोकांची नावे सामील आहेत. ज्यामध्ये 46 टक्के महिला, 39 टक्के अंडर रिप्रेझेंटेड समूह आणि 53 टक्के जगभरातील अनेक लोक सामील असणार आहेत.

विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट 18 जूनला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दर्शवला होता. त्यामुळे विद्या खूप चर्चेत होती. तिने राष्ट्रीय अवॉर्ड देखील जिंकला आहे. विद्या बालनला ‘द: डर्टी पिक्चर’साठी राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला होता.

भारतीय चित्रपट दरवर्षी ऑस्कर पुरस्कारापर्यंत जातात. विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर आता भारतीय चित्रपटांच्या बाजूने वोट देऊ शकतात. यामुळे आता आपल्या चित्रपटांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा