Friday, April 26, 2024

एकेवेळी ‘त्यांची’ लोकप्रियताच अशी होती की पहिले सुपरस्टार राजेश खन्नाही आले होते टेन्शनमध्ये

रामानंद सागर यांच्या रामायणात रावणाचा महान मुलगा मेघनादची भूमिका साकारणारे विजय अरोरा हे त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपल्या चमकदार अभिनयाने इंद्रजितच्या व्यक्तिरेखेला जीवनदान दिले होते. रामायण मालिकेचा त्यांना  कारकिर्दीत बराच फायदा झाला. आज 2 फेब्रुवारी रोजी विजय अरोरा यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने विजय अरोरा यांच्या चित्रपट कारकीर्दीवर एक नजर टाकूयात.

विजय अरोरा यांनी 1971 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘जरूरत’ होता. या व्यतिरिक्त त्यांनी झीनत अमानबरोबर ‘यादों की बारात’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटाचे रोमँटिक हिट गाणे ‘चुरा लिया है तुमने’ हे त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. गाण्यात तपकिरी चेहरा असलेल्या विजय अरोरा यांच्या स्टाईलने मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या.

विजय अरोरा यांनी ‘जरूरत’, ‘जीवन ज्योति’, ‘राखी और हथकडी’, ‘आखिरी चीख’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘सबसे बडा सुख’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 110 चित्रपट आणि बर्‍याच मालिकांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

असे म्हणतात की विजय अरोरा एकेकाळी इतके प्रसिद्ध झाले होते की राजेश खन्ना यांनासुद्धा वाटू लागले की त्यांच्या लोकप्रियतेस धोका निर्माण झाला आहे. बर्‍याच हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 1987 मध्ये रामानंद सागर यांची नजर विजय अरोरावर पडली आणि इतिहास घडला. रामायणातील मेघनाद भूमिका त्यांनी साकारली व पुढे संपूर्ण कारकीर्दीत मेघनाद या भूमिकेबद्दल त्यांना आठवले जाऊ लागले. त्यांनी हे पात्र इतके जोरदारपणे केले होते की आजही लोक त्यांच्यात मेघनादची प्रतिमा पाहतात.

2007 मध्ये पोटाच्या कर्करोगामुळे 62 व्या वर्षी त्यांनी जग सोडले. लॉकडाऊनमध्ये रामायण प्रसारित झाले तेव्हा विजय अरोरा स्वत:ला आपल्यात नव्हते. मात्र, त्यांच्या अभिनयामुळे ते नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.

महत्त्वाच्या बातम्या-

साडीत खुलून आलं अप्सरेच सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे साडीतील पाच खास फोटो

गुलाबी रंगात ‘अप्सरेचं’ सौंदर्य आणखीनच खुललं, सोनालीच्या अदा अन् सौंदर्य पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

अभिज्ञा भावेने बांधली साताजन्माची गाठ! मेहुलसोबत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरूवात; पाहा लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ

हे देखील वाचा