Monday, June 24, 2024

‘लायगर’ चित्रपटातील ‘या’ बालकलाकाराला सुपरस्टार विजय देवरकोंडा वाटतो ‘एकदम कूल’, रंगलीय फोटोची चर्चा

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा या दिवसात त्याचा आगामी चित्रपट ‘लायगर’मुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि बॉक्सर माईक टायसन महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. अशातच या चित्रपटाचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अनन्या आणि विजय बालकलाकार गेल विदाना (Gael Vidana) सोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोत बालकलाकार स्टाईलमध्ये दिसत आहे. तो मोठी हॅट घालून बसला आहे.

‘लायगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ या दिवसात यूएसमध्ये विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि माईक टायसनसोबत शूटिंग करत आहेत. येथील शूटिंग पूर्ण झाल्यावर चित्रपटाची संपूर्ण टीम लॉस एंजेलिसमध्ये एका महत्वाच्या सीनची शूटिंग करण्यासाठी जाणार आहे. अशातच gael vidanaने विजयसोबत काही फोटो शेअर केले आहेत. त्यांच्यासोबत अनन्या देखील दिसत आहे. (Vijay devarkonda ananya pandey’s liger movie child artist gael vidana share a photos with celebraty on social media)

हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “विजय, अनन्या आणि टायसन मित्र होते.” या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. यासोबत त्याने अनन्याचे नाव चुकीचे घेतल्यामुळे तिची माफी देखील मागितली आहे. त्याला विजय एकदम कूल वाटतो. या फोटोत त्याला पाहून सगळेच खूप खुश झाले आहेत. या चित्रपटात त्याचे काय काम असणार आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हे कलाकार एकत्र आलेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी धमाल असणार आहे. याची सगळ्यांना खात्री आहे. त्याने ‘लायगर’ चित्रपटाच्या सेटवरील घोडेस्वारी करतानाचा एक फोटो देखील शेअर केला होता.

याआधी अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी घोडेस्वार करताना फोटो शेअर केले होते. जिथे त्यांनी गेलसोबत शूटिंग केली होती. असे म्हटले जात आहे की, इथे या चित्रपटातील एक मोठा भाग शूट केला आहे. या चित्रपटात विजय एमएमए फायटर ही भूमिका निभावत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि चर्मी कौर करत आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची शूटिंग होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल

-ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल

-‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच

हे देखील वाचा