Thursday, June 13, 2024

57 वर्षीय शाहरुख खानच्या फिटनेसची आनंद महिंद्रांना पडली भुरळ, म्हणाले, ‘आयुष्य खूप….’

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान‘ या चित्रपटामुळे आजकाल सतत चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पठाणनंतर किंग खानला पुन्हा एकदा ॲक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटाचे ‘जिंदा बंदा’ हे गाणे रिलीज झाले असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याला सर्व सामान्यपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी शाहरुखच्या एनर्जीचे कौतुक केले आहे. आता या यादीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर ‘जवान’ मधील ‘जिंदा बंदा’ व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आणि शाहरुख खानचे (Shahrukh Khan) कौतुक केले. आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, “आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरून ‘जिंदा बंदा’ गाण्याचा व्हिडीओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, 57 वर्षांचा आहे हिरो? त्यांचं वाढत्या वयाची प्रक्रिया गुरुत्वाकर्षण एनर्जीला आव्हान देत आहे. ते जास्तीत लोकांच्या 10 पटीने अधिक जीवंत आहेत. जिंदा बंदा असावा तर असा.

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर किंग खानची प्रतिक्रियाही आली आहे. प्रशंसाला उत्तर देताना त्यांनी लिहिले, “आयुष्य खूप लहान आणि वेगवान आहे सर, फक्त ते चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.”शक्य तितक्या लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे, काहीही होऊ शकते… आशा आहे की काही लोकांना ताऱ्यांसोबत पोहण्याची संधी मिळेल… त्यांना आनंदाचे काही क्षण मिळतील.”

 ‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे गाणे सोमवारी रिलीज झाले. या गाण्यामध्ये 1000हून अधिक महिला कलाकारांनी काम केले आहे. केवळ एका दिवसात याला यूट्यूबवर 46 दशलक्ष व्ह्यूजचा आकडा पार केला आहे. हे गाणं तीन भाषांमध्ये रिलीज झाले आहे हिंदी व्हर्जन ‘जिंदा बंदा’, तमिळ व्हर्जन ‘वंधा एडम’ आणि तेलुगू व्हर्जन ‘धुम्मे धुलिपेला’. (After watching ‘Zinda Banda’, 57year old Shahrukh Khan’s fitness was impressed by Mahindra)

हेही वाचा-
ब्रेकिंग! अभिनेत्री अदा शर्माची अचानक बिघडली तब्येत, धक्कादायक कारण आले समोर
दिग्दर्शकाच्या निधनामुळे अक्षय कुमारला धक्का! उचलले ‘हे’ पाऊल, लगेच वाचा

हे देखील वाचा