Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

याला काय अर्थय! ऋतिक- सैफच्या ‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन अक्षयच्या फ्लॉप सिनेमांपेक्षाही कमी, फक्त…

सुपरस्टार ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा‘ हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा ट्रेलर पाहून लाेक ज्याप्रकारे वेडे झाले होते, ते पाहता असे गृहित धरले जात हाेते की, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ जबरदस्त असेल. मात्र, आता बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम वेधा’च्या ओपनिंग कलेक्शनचे आकडे समाेर आले आहेत. हे आकडे पाहून चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा खूपच खराब झाल्याचे बोलले जात आहे. 

ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या चित्रपटाने शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) बॉक्स ऑफिसवर केवळ 10.50 कोटींची कमाई केली आहे. मात्र, यात एक सकारात्मक बाजू अशी आहे की, शुक्रवारी आगाऊ बुकिंगमधून ‘विक्रम वेधा’चे ग्रॉस कलेक्शन 2.97 कोटी रुपये होते. म्हणजेच चित्रपट पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक भरपूर होते, त्यामुळेच कलेक्शनचा टप्पा 10 कोटी रुपयांनी ओलांडला आहे.

‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन सर्वात कमी
सन 2022 मधील बॉलिवूड चित्रपटांच्या सर्वात मोठ्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट अव्वलस्थानी आहे. या सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी 36 कोटी रुपये कमावले. यानंतरची यादी पाहिली, तर ऋतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन सर्वात कमी आहे. त्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंग चड्ढा’ यांचा समावेश आहे. मात्र, ‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन आलियाचा हिट चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या बरोबरीचे आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘विक्रम वेधा’च्या आगाऊ बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. आगाऊ बुकिंगमध्ये, चित्रपटाची 13,800 पेक्षा जास्त तिकीटे विकली गेली आहेत. शनिवारसाठी ‘विक्रम वेधा’चे आगाऊ बुकिंग 3.36 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारसाठी चित्रपटाची बुकिंग वाढली आहे, तसेच चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचाही फायदा होणार आहे.

‘विक्रम वेधा’ 4000हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट भारतात 4000हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान हे दोन अव्वल दर्जाचे अभिनेते आहेत. अशा परिस्थितीत, ओपनिंगनुसार, ‘विक्रम वेधा’ला बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. या चित्रपटाचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन किती आहे, हे पाहणे रंजक ठरेल.

सन 2022 मधील बॉलिवूड चित्रपटांच्या टॉप ओपनिंगची यादी खालीलप्रमाणे-
1. ब्रह्मास्त्र- 36 कोटी रुपये
2. भूल भुलैय्या – 14.11 कोटी रुपये
3. बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये
4. लाल सिंग चड्ढा- 11.70 कोटी रुपये
5. सम्राट पृथ्वीराज- 10.70 कोटी रुपये
6. विक्रम वेधा- 10.50 कोटी रुपये
7. गंगूबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये
8. शमशेरा- 10.25 कोटी रुपये
9. जुगजुग जिओ- 9.28 कोटी रुपये
10. रक्षाबंधन- 8.20 कोटी रुपये

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ
घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच दीपिका अन् रणवीरची ‘तसली’ चॅट आली समोर, तुम्हीही वाचाच

हे देखील वाचा