Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड शाळेत असताना विक्रांत मेसीने केली होती मारामारी; मुलाची हालत झाली होती खराब

शाळेत असताना विक्रांत मेसीने केली होती मारामारी; मुलाची हालत झाली होती खराब

बॉलिवूडचा अभिनेता विक्रांत मैसी हा काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याची गणना बॉलिवूडमधील प्रतिभाशाली अभिनेत्यांमध्ये केली जाते. विक्रांत मैसी सध्या त्याची आगामी फिल्म ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या फिल्ममूळे चर्चेत आहे. यात तो तापसी पन्नु सोबत मेन लीड रोलमध्ये दिसणार आहे. याच दरम्यान विक्रांत मैसीने एक सनसनिट खूलासा केला आहे.

विक्रांत मैसीने त्याच्या शाळेच्या दिवसाची आठवण काढत त्याने एका शाळेतल्या घटनेची आठवण सांगितली. विक्रांत म्हणाला, “त्याने शाळेत असताना एका मुलाला रागात बुक्का मारला होता. नंतर त्याला समजले की, त्या मुलाला फिट येण्याचा आजाराने विळखा घातला आहे. त्यानंतर त्याला वाटल की तो या हाताने कोणाला कसं मारू शकतो. विक्रांत म्हणाला यानंतर तो नेहमीच भांडणात शिकार होणारा व्यक्ती ठरत असे. कारण त्याला समजल कि तो एखाद्याला किती नुकसान पोचवू शकतो.”

प्रखरच्या प्रवचन पॅाड कास्टमधे विक्रांतने ‘हसीन दिलरुबा’ आणि त्याचा सिक्वल ‘फिर आई हसीन दिलरुबा’ यातील तो भूमिका करत असलेल्या रिशु या रोलच उदाहरण दिलं आणि आपल्या ‘हिंसक प्रवृत्ती’ ला ओळखून त्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे.तो पुढे त्याचा स्वतःहाचा अनूभव सांगत म्हणाला, “मी शाळेत असताना कराटे करत होतो,त्यामूळे मी स्वतःला विजेता समजायचो आणि आक्रमक झालो होतो. सुट्टीच्या दिवसात मी एका मुलाच्या जबड्यावर बुक्का मारला आणि याची त्याला कल्पना नव्हती कि त्याला फिट येण्याचा त्रास आहे.”

मी बघितल तो मुलगा माझ्या समोर त्याचा होश हरवून बसत आहे, त्याला त्रास होत आहे.नंतर त्याचा मोठा भाऊ आला आणि मला मारल. आणि हे सगळं काही सेकंदात झालं.मला त्याच्या भावाने मारल्याच काहीच वाटत नव्हत. कारण मला भीती होती तो मुलगा मरून जाऊ नये. यानंतर मी भांडणात फक्त मार खायचो कारण मी कोणावर हात उचलला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अल्लू अर्जुन करत आहे’पुष्पा 2′ च्या क्लायमॅक्ससाठी ॲक्शन सीक्वेन्स शूट, दाखवली मनोरंजक झलक
वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे ! अभिनेत्री सुरेखा कुडची यांची फेसबुक पोस्ट चर्चेत…

हे देखील वाचा