Tuesday, May 21, 2024

‘रफू चक्कर’सोबत शिवानी अन् विराजसने सुरू केला नवा व्यवसाय, ब्रँडच्या नावाची होतेय जोरदार चर्चा

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. तसेच, ते जेव्हा एखादी नवीन गोष्टी प्रेक्षकांपुढे घेऊन येतात, तेव्हा त्याची अधिकच चर्चा रंगू लागते. अशीच चर्चा सध्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे यांच्याविषयी रंगली आहे. यामागील कारण म्हणजे, शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी या कलाकार जोडप्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे 3 मे, 2022 रोजी लग्नबंधनात अडकले होते. हे दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. त्यांचे प्रेम त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओंमधून दिसते. आता या दोघांनीही एक पाऊल पुढे टाकत नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचा व्यवसाय हा कपड्यांचा आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपल्या नवीन व्यवसायाबद्दल माहिती दिली. या दोघांनी ‘विरानी’ या नावाने कपड्यांच्या ब्रँडची घोषणा केली. विशेष म्हणजे, सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘रफू चक्कर’ (Rafoo Chakkar) या ब्रँडसोबत त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. जर ‘विरानी’ ब्रँडचे टी-शर्ट विकत घ्यायचे असतील, तर ते तुम्हाला ‘रफू चक्कर’ या ब्रँडच्या वेबसाईटवरून विकत घेता येतील.

शिवानी आणि विराजस यांनी हा ब्रँड मुख्यत: नाटकप्रेमींना लक्षात घेऊन सुरू केलाय. तसेच, त्यांच्या या टी-शर्टवर ‘शांतता… नाटक चालू आहे’, इंग्रजीत ‘straight outta theatre’ म्हणजेच ‘थेट थिएटरमधून बाहेर’ असे वेगवेगळे मेसेज लिहिण्यात आले आहेत.

काय आहे रफू चक्कर?
‘रफू चक्कर’ हा पुणे स्थित कपड्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडचे कपडे अत्यंत स्वस्त दरात मिळतात. खेळाडू, कलाकार अशा वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो असणारे टी-शर्ट्सही रफु चक्कर या ब्रँडकडे उपलब्ध आहेत. रफु चक्कर हा कपड्यांचा ब्रँड दोन युवा मुलांनी सुरू केला आहे. त्यांचे नाव शौनक रेमणे आणि चैतन्य देशपांडे असे आहे. या ब्रँडला सुरू होऊन जवळपास दोन वर्षे झाली असून हा ब्रँड वेगाने पुढे येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘तु मेरा है और मेरा ही रहेगा!’ शेहनाज गिलच्या भाषणाने भावूक झाले चाहते, पाहा व्हायरल व्हिडिओ
‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या 60व्या वर्षी थाटला संसार, सोशल मीडियावर मिळाले खरे प्रेम

हे देखील वाचा