Thursday, December 5, 2024
Home मराठी प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच, पण आशय अन् साेनालीच्या ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य उलगडणार का?

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच, पण आशय अन् साेनालीच्या ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य उलगडणार का?

अभिनेता पुष्कर जोग याचा बहुचर्चित ‘व्हिक्टाेरिया’ हा मराठी चित्रपट 16 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘व्हिक्टाेरिया’ या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समाेर आला हाेता. अशातच आता या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा वाढवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

व्हिक्टाेरिया (victoria) या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विराजस कुलकर्णी (virajas kulkarnis) दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. जीत अशाेक आणि विराजस यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अशातच आता या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाच्या रहस्यमयी ट्रेलरने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात युकेमधील ‘व्हिक्टोरिया’ नावाच्या एका आलिशान हॉटेल पासून होते. हॉटेलमध्ये रेणुका नावाच्या एका महिलेचा मृत्यू झालेला असतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे दोघे हॉटेलमध्ये राहायला जातात आणि या स्टाेरीतील थरार सुरू होतो. साेनाली आणि आशय या हॉटेलच्या प्रतिबंधित जागेत जाण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात पुष्कर जोक त्यांना अडवतो. तेव्हापासून सोनालीला त्या हॉटेलमध्ये रेणुकाचा भूत दिसायला लागतं. ती दोघेही हॉटेलमधून कशी बाहेर पडणार? आणि त्या भूताचं पुढे काय होणार? हे ‘व्हिक्टाेरिया’ चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासाेबतच हीरा सोहल ही अभिनेत्रीही सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ( virajas kulkarnis marathi movie victoria film trailer is out now )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एअरलाईन्सच्या निष्काळजीपणामुळे अभिनेत्रीची हरवली बॅग, ट्विटद्वारे व्यक्त केला संताप

जिनेलिया ‘वेड’ चित्रपटानंतर थेट ‘या’ मराठी मालिकेत करतेय एंट्री, पाहाच एकदा प्रोमो

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा