Friday, January 27, 2023

एअरलाईन्सच्या निष्काळजीपणामुळे अभिनेत्रीची हरवली बॅग, ट्विटद्वारे व्यक्त केला संताप

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने सोशल मिडियाद्वारे ट्विटरवर जाऊन एअरलाइन्स कंपनीवर नाराजी व्यक्त केली. वास्तविक, अभिनेत्री यापूर्वी सौदीला गेली होती, ज्यामध्ये एअरलाइन्सने तिची बॅग हरवली. यामुळे माहिरा चांगलीच नाराज झाली आहे. मात्र, एअरलाइन्सकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिने ट्विटरचा आधार घेतला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, तीन दिवसांपूर्वी तिची बॅग हरवली होती. मात्र ,अद्याप तिला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तीन दिवस उलटूनही हरवलेला सामान परत न मिळाल्याने अभिनेत्री माहिरा (mahira khan) प्रचंड नाराज आहे. अशा परिस्थितीत तिने ट्विटरचा आधार घेतला आहे. माहिराने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझी एक बॅग सौदी एअरलाइन्सने हरवली, मला येऊन 3 दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत माझी बॅग सापडलेली नाही. दिवसातून अनेक वेळा फोन करूनही माझ्या बॅगचा पत्ता नाही.” या ट्विटवर तिला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा अभिनेत्रीनं केली आहे.

माहिराने तिच्या ट्विटमध्ये या एअरलाईन्स कंपनीलाही टॅग केले आहे. दुसरीकडे, या दिवसांमध्ये अभिनेत्री रेड सी फिल्म फेस्टिव्हलसाठी जेद्दाहला पोहोचली आहे, तिथून तिचा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबतचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकत्र बसून एकमेकांकडे हसताना दिसले.

याआधी हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राणा डग्गुबती यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अशीच समस्या उघड केली होती. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अभिनेत्याचे सामान हरवले हाेते, त्यानंतर त्याने एअरलाइनला टॅग केले आणि त्याच्या हरवलेल्या सामानाबद्दल चाहत्यांना सांगितले हाेते आणि त्यामागे एअरलाइनला जबाबदार ठरवले हाेते.

अभिनेत्री माहिरा खान हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर माहिराने ‘सुपरस्टार’, ‘रईस’ यासारख्या दमादार चित्रपटात अभिनय केला आहे.( bollywood actress mahira khan classes saudi airlines as lost bag expressed anger in tweet)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘तू सेफ्टी पिन लावली असती…’, उर्फीचा पदर पडताच विस्फारले चाहत्यांचे डाेळे, केल्या भन्नाट कमेंट

जिनेलिया ‘वेड’ चित्रपटानंतर थेट ‘या’ मराठी मालिकेत करतेय एंट्री, पाहाच एकदा प्रोमो

हे देखील वाचा