Wednesday, December 6, 2023

जिनेलिया ‘वेड’ चित्रपटानंतर थेट ‘या’ मराठी मालिकेत करतेय एंट्री, पाहाच एकदा प्रोमो

कलाविश्वातील प्रसिद्ध जोडपं म्हणजेच रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख सध्या आपल्या ‘वेड‘ चित्रपाटामुळे खुच चर्चेत आहेत. शाळकरी वयातील प्रेम दाखावणाऱ्या चित्रपटाच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. नुकतांच ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाहत्यांची फेवरेट जोडीची केमिस्ट्री पाहूण प्रेक्षक थक्क झाले आहेत.

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmuk) यांच्या ‘वेड’ चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यांमुळे चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. जिनेलियाचा हा पहिला मराठी चित्रपट आहे असून दोघेही प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेट देत आहेत.

नुकतंच जिनेलिया ‘रंग माझा वेगळा‘ या मालिकेमध्ये पोहोचली होती. मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

 

View this post on Instagram

 

वेड चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: अभिनेता रितेश देशमुख याने केले आहे. तसेच या चित्रपटाद्वार प्रेक्षकांची फेवरेट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच चित्रपटाप्रती उत्सुकता लागली आहे. जिनेलिया या चित्रपाटद्वारे मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. रितेश आणि जिनेलिया शिवाय या चित्रपाटमध्ये मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी, शुंभकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय अजय-अतुल संगित देणार आहेत.

 

View this post on Instagram

 

जिनेलियाने आजपर्यत बॉलिवूड, तामिळ तेलिगू आणि कन्नड चित्रपाटमध्येही काम केले आहे. महाराष्ट्राची सून असली तरी ती बऱ्यापैकी चांगली मराठी बोलते मात्र पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट खूपच महत्वाचा ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब
‘हप्पू की उलटन पलटन’ फेम कामना पाठक अडकली लग्नबंधनात, ‘या’ अभिनेत्यासोबत घेतल्या साताजन्माच्या गाठी

हे देखील वाचा