‘पॉप्युलॅरिटी संकट में है!’ करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म देताच तैमुर झाला ट्रोल; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई- वडील बनले आहेत. पतौडी कुटुंबात आणखी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. आज (२१ फेब्रुवारी) रोजी बेबोने म्हणजेच करीनाने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. मात्र, करीना आणि सैफ यांनी अद्यापही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्या मुलाच्या बातमीने त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. यादरम्यान करीनाचा पहिला मुलगा तैमुर अली खान आता मोठा भाऊ झाला आहे. अशातच त्याच्यावर मीम्स बनवले जात असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सोशल मीडियावरील तैमुरला ट्रोल करत एका युजरने म्हटले की, ‘लोकप्रियता संकटात सापडली आहे.’

दुसऱ्या एका युजरने अक्षय कुमारचा ‘हेरा फेरी’ चित्रपटातील बाबू भाईचा डायलॉग वापरत म्हटले की, ‘बहुत गलत हुआ रे बाबा.’

याचसोबत अनेक युजर्स तैमुरचे मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीच्या पोस्टनुसार करीना कपूरने सकाळी 4:45 वाजता तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सैफ आणि करीनाचे चाहते त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत.

खरं तर सैफला पहिली पत्नी अमृता सिंगकडून दोन अपत्य आहेत. त्यांचे नाव सारा अली खान आणि इब्राहिम खान असे आहे. यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी, 2016 मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.