अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन अनेकदा तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. अर्जुन रामपाल यांची मुलगी माहिका रामपाल, अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान यांची नावे या ग्रुपमध्ये सामील आहेत. दोन दिवसांपूर्वी, रविवारी (दि. 25 डिसेंबर)ला मुंबईत एका ख्रिसमस पार्टीत हे सर्व स्टार किड्स एकत्र दिसले होते, ज्यांचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, न्यासाचा (nysa devgan) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती नुकतीच जुहूमध्ये दिसली होती. हा व्हिडिओ समोर येताच न्यासा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये न्यासा धावताना दिसत आहे आणि धावण्याच्या प्रक्रियेत ती अडखळते, ज्यामुळे ती पडता पडता वाचते. आता चाहत्यांच्या मनात असा प्रश्न उपस्थित हाेत आहे की, न्यासाची नजर कोणावर पडली ज्यामुळे ती धावू लागली?
View this post on Instagram
जेव्हा न्यासा देवगनला जुहूमध्ये स्पॉट केले गेले, तेव्हा काही पॅपराझींनी तिला घेरले आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हे पाहून न्यासा तिच्या कारकडे धावू लागली. चेहरा लपवण्याच्या प्रयत्नात ती अडखळली आणि यावेळी तिने मोठ्या कष्टाने स्वत:ला सांभाळले. न्यासासमोर तिचा मित्र नसता तर कदाचित ती जमिनीवर पडली असती.
दुसरीकडे, न्यासाला तिच्या ख्रिसमस ड्रेससाठी खूप ट्रोल केले जात होते, ज्यामध्ये तिने गुलाबी डीप नेक ड्रेस घातला हाेता. अलीकडेच, तिने तिच्या मित्रांसोबत ख्रिसमस पार्टीला हजेरी लावली होती, ज्यामध्ये तिने डीप नेक ड्रेस घातला होता, जो सोशल मीडिया युजर्सला कदाचित आवडला नाही आणि त्यामुळे ते तिला सतत ट्रोल करत आहेत.
न्यासा पॅपराझींची आवडती स्टार किड आहे. एवढेच नाही तर तिचा सोशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.(viral social ajay devgn and kajol daughter nysa devgan suffers oops moments in pink crop with her friends mahikaa rampal ibrahim ali khan video went viral)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा
साऊथ सुपरस्टारचा सुरक्षा रक्षकांवरच आरोप; म्हणाला, ‘भाषेमुळे माझ्या आई-वडिलांना…’