Saturday, January 28, 2023

सनी देओलवर खूप प्रेम करायची अमृता सिंग, पण अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘या’ गुपितामुळे अभिनेत्रीचे उडाले होश

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी (Saif Ali Khan) लग्न करण्यापूर्वी ही अभिनेत्री तिच्या कथित अफेअर्समुळे खूप चर्चेत होती. माध्यमांतील वृत्तानुसार, अमृताचे अभिनेता सनी देओल (Sunny Deol) , क्रिकेटर रवी शास्त्री आणि अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्यासोबत अफेअर होते. चला तर मग जाणून घेऊया अमृता सिंग आणि सनी देओलबद्दल, ज्यांच्या जवळीकांच्या चर्चा एकेकाळी होत होत्या.

खरं तर, सनी देओल आणि अमृता सिंग यांनी 1983 मध्ये आलेल्या ‘बेताब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमृता आणि सनी देओलमध्ये जवळीक वाढली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि सनी आणि अमृता यांच्या जोडीने प्रेक्षकही थक्क झाले. ‘बेताब’ चित्रपटातील अमृता आणि सनी यांच्यावर चित्रित केलेले ‘जब हम जवान होंगे जाने कहाँ होंगे’ हे गाणे खूप गाजले. मात्र, सनी देओलने अमृतासोबतच्या लग्नाची बाब लपवून ठेवली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, सनी देओलने त्याची गर्लफ्रेंड पूजासोबत इंग्लंडमध्ये लग्न केले होते. मात्र त्याने याबद्दल कोणालाच सांगितले नाही, अगदी अमृतालाही याबद्दल काहीही माहिती नव्हती. खर तर, धर्मेंद्र (Dharmendra) यांना हे नको होते की, मुलगा सनीने लग्न केल्याची चर्चा बाहेर पडावी आणि त्याचा चित्रपटात प्रवेश करताच त्याच्या करिअरवर वाईट परिणाम होईल.

मात्र, जेव्हा अमृता सिंगला सनी देओलचे लग्न झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे बोलले जात आहे. सनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता क्रिकेटर रवी शास्त्रीसोबतच्या जवळीकतेमुळे चर्चेत आली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा :
विवाहित असूनही अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता सनी देओल, प्रेम प्रकरणांची होती भलतीच चर्चा
सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे अफेअर एवढे गाजले होते की, अभिनेत्रीची मुले देखील त्याला म्हणायचे ‘छोटे पप्पा’

हे देखील वाचा