Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड लंडनमध्ये हातात पिशव्या घेऊन अनुष्का सोबत जाताना दिसला विराट! व्हिडीओ व्हायरल…

लंडनमध्ये हातात पिशव्या घेऊन अनुष्का सोबत जाताना दिसला विराट! व्हिडीओ व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्नानंतर बॉलिवूडला जवळजवळ गुडबायच  केले आहे. पण आता तीच्याकडे पाहता असे दिसते की तिने केवळ बॉलिवूडचाच नाही तर भारताचाही कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच, लंडनमधून अनुष्का आणि विराटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे जोडपे लंडनमध्ये खरेदी करताना दिसत होते. 

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहेत, जिथे ते ग्लॅमरच्या जगापासून दूर शांत आणि आनंदी जीवन जगत आहेत. नुकतेच दोघेही लंडनमध्ये खरेदीसाठी बाहेर पडले होते, तेव्हा कोणीतरी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. अनुष्काने काळ्या पँटसोबत पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता आणि लाल हॅण्डबॅग नेली होती. तर दुसरीकडे विराट तीच्या मागे चालताना दिसला. विराटच्या हातात काही शॉपिंग बॅग होत्या.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट २०१३ मध्ये एका टेलिव्हिजन जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघांनी नंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली पण त्यांनी आपले नाते लपवून ठेवले. २०१७ मध्ये, त्यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत इटलीमध्ये खाजगी पद्धतीने  लग्न केले. या जोडप्याने जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या अपत्याचे, मुलगी वामिकाचे स्वागत केले. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये ते पुन्हा एकदा पालक झाले. यावेळी त्यांनी एका मुलाचे स्वागत केले तेव्हा. त्यावेळी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर खुलासा केला की त्यांनी मुलाचे नाव अकाय ठेवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का आणि विराट आता आपल्या दोन्ही मुलांसह लंडनला शिफ्ट झाले आहेत. मात्र, अनुष्का लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर खुलासा केला की ती लवकरच मुंबईत परतणार आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का शर्मा शेवटची शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

लग्नानंतर पार्टनर सोबत कशी राहणार? श्रद्धा कपूरने केले मजेशीर खुलासे…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा