Monday, July 1, 2024

जेव्हा विशाल दादलानीने केला होता त्याच्या वाईट सवयीचा खुलासा; एका दिवसाला पित होता ४० सिगारेट, पुढे जे झाले…

आज बॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच बॉलिवूड गाण्यांची क्रेझ देखील सर्वत्र पसरली आहे. गाण्यांना देखील तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत असतो. याचे कारण म्हणजे बॉलिवूड गायक आणि गीतकार खूप उत्कृष्ट पद्धतीने गाणी तयार करत असतात. बॉलिवूडमधील असाच एक प्रसिद्ध गायक आणि गीतकार म्हणजे विशाल दादलानी. आज तो त्याच्या ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २८ जून १९७३ साली मुंबई येथे झाला होता. त्याच्या वाढदिवशी त्याचे मित्र, चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

विशाल दादलानी याने शेखर राजवानीसोबत हिंदी पासून ते मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याने त्याच्या करीअरची सुरुवात ‘प्यार में कभी कभी’ या गाण्यापासून केली होती. प्रेक्षकांनी त्याच्या या पहिल्याच गाण्याला जोरदार पसंती दर्शवली होती. आज विशालच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. जे त्याच्या प्रत्येक गाण्याला पसंती देतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का ?? एका सवयीमुळे त्याचे करिअर अडचणीत आले होते.

विशालला एके काळी सिगारेटची खूप सवय लागली होती. याचा खुलासा त्याने स्वतः केला होता. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्याने एका दिवसात 40 पेक्षाही जास्त सिगारेट घेण्याबाबत सांगितले होते. सोबतच हे देखील सांगितले की, या कारणाने त्याचे करिअर अडचणीत आले होते. (Vishal Dadlani birthday special, let’s know some unknown fact about his life)

विशाल दादलानीने मागच्या वर्षी 2020 मध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. विशालने एक व्हिडिओ शेअर करून भली मोठी पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “ऑगस्ट २०१९ च्या शेवटी मी सिगारेट पिणे सोडून दिले. मला अशी सवय लागली होती, मी दिवसभरात 40 सिगारेट पित होतो. त्यामुळे माझ्या घशाला खूप त्रास जाणवत होता. माझ्या आवाजाने जवळपास सगळी हिंमत सोडून दिली होती. मी ही गोष्ट कोणालाही कळून दिली नाही. मी कंट्रोल करू लागलो.”

त्याने पुढे लिहिले की, “मला हळू गाणे गाता येत नव्हते. ही गोष्ट प्रत्येक गायकाला माहित आहे की, लाऊड टेकपेक्षा यात जास्त मेहनत लागते. मागील दोन वर्षांपासून मी १००% नाही देऊ शकलो. जवळपास ६ महिन्यांपर्यंत सिगारेट सोडल्यानंतर माझा आवाज पूर्वीसारखा होत आहे. माझा साफ टोन परत येत आहे. माझा कंट्रोल आधीपेक्षा खूप चांगला आहे. मी पुर्वीसारखा गाऊ शकतो, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, जर तुम्ही सिगारेट पित असाल तर स्वतःला संपवण्याआधीच ही सवय सोडून द्या.”

विशाल दादलानीला खरी ओळख २००३ मध्ये ‘झंकार बीट’ मधून मिळाली. या चित्रपटातील त्याचा आवाज प्रेक्षकांना खूप आवडला होता. यासाठी त्याला ‘न्यू टॅलेंट हंट आरडी बर्मन’ हा पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याच्या करीअरची गाडी एवढ्या सुसाट वेगाने धावली की, त्यानंतर त्याला केवळ यशच मिळाले. विशालने शेखरसोबत शाहरुख खानचा ड्रीम प्रोजेक्ट ‘रावण’साठी संगीत दिले होते. ‘ओम शांती ओम’ मध्ये शानदार काम केल्याने त्याला आयफा, फिल्म फेअर आणि अप्सरा अवॉर्ड मिळाले होते. मागील काही दिवसात तो ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये परीक्षक होता. त्यामुळे तो खूप चर्चेत आला होता. त्याने हा शो सोडून दिला, आता त्याच्या जागी हिमेश रेशमिया आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

हे देखील वाचा