Thursday, July 18, 2024

‘मी मुले दत्तक घेऊ शकतो नाहीतर…’ नंदिता मेहतानीसोबत लग्न ठरल्यानंतर विद्युत जामवालने केला मोठा खुलासा

सध्या बॉलिवूड सातत्याने चांगल्या बातम्या येत आहेत. काही बॉलिवूड कलाकार पालक झाले आहेत तर काही पालक होणार आहेत. खुदा हाफिज अभिनेता विद्युत जामवाल(Vidyut Jammwal)ही अलीकडेच माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत पालकत्वाबद्दल बोलताना दिसला. विद्युत आणि नंदिता महतानी(Nandita Mahtani) रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एंगेजही झाले आहेत.

बाळाच्या नियोजनावर बोलताना विद्युत म्हणाला की, तो मुलासाठी सर्व मार्ग निवडण्यासाठी तयार आहे. तो म्हणाला की आय वी एफ किंवा सरोगसीचा, दत्तक घेऊ शकतो. तो सर्वकाही करण्यास तयार आहे. पुढे म्हणाला, मूल हे मूल असते आणि त्यांच्यात कोणीही भेद करु नये, असे विद्युतने आवर्जून सांगितले आहे. एखाद्याच्या आयुष्यात मूल यायचे ठरवले असेल तर ते कसे तरी येणारच, असेही तो म्हणाला.

विद्युत जामवालच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, काही काळापूर्वी त्याचा ‘खुदा हाफिज 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, ‘खुदा हाफिज’प्रमाणे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता नव्हती. चित्रपट कधी आला आणि गेला, हे कळलेही नाही. विद्युत त्याच्या उत्कृष्ट शरीरयष्टी आणि धोकादायक स्टंटसाठी ओळखला जातो, परंतु ‘खुदा हाफिज 2’ मध्ये तो त्याच्या ऍक्शन अवताराची जादू निर्माण करण्यात अपयशी ठरला.

बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. विद्युत जामवालने फार कमी वेळात ऍक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याला साऊथच्या चित्रपटांमध्येही खूप पसंती दिली जाते. विद्युत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘माणुसकी धर्म आणि प्रांतापेक्षा मोठी…’ बॉलिवूड कलाकारांच्या ‘या’ वागण्यामुळे दुखावली लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री
बापरे! अक्षय कुमार, प्रियांकाचे गाणे झाले तब्बल 17 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला, 2005 मध्ये झाले होते शुटिंग
आर माधवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, तुम्हीही पोट धरुन हसाल

हे देखील वाचा