‘कलाकार’ आपल्या चित्रपट, जाहिरातींमधून अनेकवेळा संदेश देताना दिसतात. त्यांचे हे व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल होतात. आता अभिनेत्री मोना सिंग हिचा असाच एक भावुक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो महिलांसाठी खूपच महत्त्वाचा आहे.
खरं तर अभिनेत्री मोना सिंगचा हा व्हिडिओ एका जाहिरात चित्रपटातील आहे. जो वंध्यत्वावर बनवला गेला आहे. यामध्ये खूप भावुक संदेश देण्यात आला आहे. गर्भधारणा चाचणी किट बनविणार्या एका कंपनीने हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
लोकसंख्येचा एक मोठा वर्ग अद्याप वंध्यत्वाला सामाजिक दुष्कर्म म्हणून पाहतो आणि त्यासाठी महिलांना बर्याचदा जबाबदार धरले जाते. त्यांची कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान यात जोडलेला दिसतो. असे म्हटले जाते की, जोपर्यंत एखादी स्त्री आई बनत नाही, तोपर्यंत ती परिपूर्ण नसते. या जाहिरात चित्रपटामध्येही अशाच मानसिकतेवर मोठा घाव घालत सकारात्मक संदेश दिला आहे. यामध्ये मोना सिंग अशाच एका स्त्रीच्या भूमिकेत आहे, जी घरातील मोठी सून आहे आणि तिला मूल नसते.
यामध्ये लहान सून गरोदर दाखवले आहे. जवळपास पावणे तीन मिनिटांच्या चित्रपटाच्या शेवटी भावुक करणारा मेसेज तेव्हा येतो, जेव्हा लहान सून आपल्याला मुलगी झाल्यावर तिचे नाव लतिका ठेवण्याबद्दल बोलते. यामुळे तिची वहिनीही प्रेरित झाली आहे. मोना सिंगने हा जाहिरात चित्रपट शेअर करत लिहिले आहे की, “She Is Complete In Herself.” याचा अर्थ असा की, ती स्वत: मध्ये परिपूर्ण आहे.
मोना सिंगने या जाहिरात चित्रपटाची शूटिंग दिल्लीमध्ये केली होती. याचे काही फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सोशल मीडियावर हा जाहिरात चित्रपट व्हायरल होता आहे.
मोना सिंगने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या शोमधून केली होती. याव्यतिरिक्त मोनाने ‘३ इडियट्स’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्यामध्ये तिने करीना कपूर खानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.
आता ती आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ