चित्रपट आणि राजकारण यांचं जुनं नातं आहे. अनेक कलाकार मंडळी राजकारणात सक्रिय आहेत. आणखी एक कलाकार राजकारणात आपला हात आजमावताना दिसणार आहे. आज (७ मार्च) पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी कोलकातामध्ये रॅली करणार आहेत. शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर होणाऱ्या रॅलीत बंगालशी जोडलेले पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळीही उपस्थिती राहणार आहेत. अशातच असे वृत्त आहे की, अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज मोदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. यासोबतच ते भाजपसाठी निवडणूक प्रचारातही सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
खरं तर मागील महिन्यात १६ फेब्रुवारीला मिथुन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यानंतर मिथुन यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तर्क वितर्क लावले जात होते.
आपल्या अभिनयाने हिट सिनेमे देणारे मिथुन यांचा राजकारणाचा प्रवास फार खास राहिला नाही. त्यांनी सन २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालची सत्ता सांभाळल्यानंतर त्यांनी मिथुन यांनी राजकारणाशी जोडण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांचे हे आमंत्रण अभिनेत्यांनी स्वीकारले होते.
तृणमूल काँग्रेसने मिथुन यांना राज्यसभेचा खासदारही बनवले होते. त्यानंतर त्यांनी सन २०१६ च्या शेवटी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी ते आपल्या आरोग्याचे कारण देत राजकारणातून बाहेर पडले होते. असे म्हटले जाते की, जवळपास एक वर्षांपूर्वीपासूनच त्यांनी स्वत: दूर जाण्यास सुरुवात केली होती. खरं तर मिथुन यांची राजकारण सोडण्याची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा त्यांचे नाव शारदा चिटफंड घोटाळ्यात आले होते.
खरं तर मिथुन शारदा कंपनीत ब्रँड एँबेसेडर होते. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने त्यांचीही चौकशी केली होती. यानंतर काही दिवसांनी मिथुन यांनी कोणाशीही फसवणूक करायची नाही असे सांगून जवळपास १ कोटी २० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. शेवटच्या एका वर्षात राज्यसभेत त्यांची उपस्थिती खूपच कमी असायची.
मिथुन यांचा जन्म १६ जून, १९६० रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला होता. ‘मिथुनदा’ हे त्यांचे निकनेम आहे. त्यांनी सन १९७७ साली ‘मृगया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले. त्यात ‘वीर’, ‘गोलमाल ३’, ‘अग्नीपथ’, ‘ओह माय गॉड’, ‘बॉस’, ‘डिस्को डान्सर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे. त्यामध्ये ‘जॅकी श्रॉफ’, ‘धर्मेंद्र’, ‘गुलशन ग्रोव्हर’, ‘शक्ती कपूर’, ‘अमिताभ बच्चन’, ‘रेखा’, ‘मोहन जोशी’ यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा