बॉलिवूडमध्ये सध्या एका जोडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे, ती जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर होय. त्यांनी आपल्या लग्नापासून ते प्रेग्नंसीच्या खुलास्यापर्यंत सर्वांची उत्सुकता वाढवली आहे. यानंतर त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाल करत आहे, त्यामुळे हे जोडपे प्रेक्षकांच्या नेहमीच चर्चेत असते. हे जोडपे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याने यांचा मोठा चाहतावर्ग बनला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरने आपल्या आणि आलियाचा बेडरुममधील एक किस्सा शेअर केला आहे. चला तर जाणून घेऊया का, काय आहे तो किस्सा.
‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करत आहे. यासोबतच या चित्रपटातील मुख्य कलाकारही म्हणजेच आलिया भट्ट (Alia Bhatt) आण रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हेही चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. कधी त्यांच्या फोटोंनी, तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा रणबीरने आपल्या आणि प्रेग्नंट पत्नी आलियाचा आपल्या बेडरुममधला एक रोमांचक किस्सा सांगितला आहे. रणबीर हा किस्सा सांगत असताना अयान मुखर्जीही लाजतो. मात्र, आलिया त्याच्या या किस्स्यावर होकार देते आणि पुढील माहिती सांगते. तसेच तो किस्साही पूर्ण करते.
झाले असे की, रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की, “रोज रात्री मी आणि आलिया आमच्या बेडरुममध्ये हाच विचार करत असतो की, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये काय काय असेल आणि स्टोरी कशी असेल.” हे बोलत असताना आलिया भट्टही दुजोरा देत हा किस्सा पूर्ण करते.
View this post on Instagram
या मुलाखतीमध्ये रणबीर आलिया सोबत दिग्दर्शक आयान मुखर्जी(Ayan Mukerji) देखिल असतो आणि त्यांचे असे वक्तव्य एकून तोही लाजतो. आलिया आणि रणबीरच्या जोडीला तर सोशल मीडियावर चांगलाच क्रेझ मिळत आहे आणि सोबतच यांच्या येणाऱ्या बाळासाठी देखिल चाहते खूपच उत्सुक आहेत. यांच्या सारखच प्रेक्षकही त्यांचे बळाची आतुरतेने वाट पाहात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’
‘पनीर, लोणचं, सलाड, थोडासा बच्चन सगळे एकटे पडले’, राजूंच्या निधनानंतर हेमांगीची भावूक पोस्ट व्हायरल
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’