Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड सलमान खानने एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याच्या लग्नावर दिली होती प्रतिक्रिया; अभिषेकबद्दल केले होते ‘असे’ वक्तव्य

सलमान खानने एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याच्या लग्नावर दिली होती प्रतिक्रिया; अभिषेकबद्दल केले होते ‘असे’ वक्तव्य

बॉलिवूडमध्ये दरदिवशी कलाकारांच्या रिलेशनशीपबाबत चर्चा होत असतात. मात्र, काही कलाकार असे असतात, त्यांच्या रिलेशनशीपबाबत नेहमीच चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. यापैकीच एक म्हणजे अभिनेता सलमान खान होय. सलमान खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांपैकी एक होती. मात्र, काही कारणास्तव ही जोडी तुटली. असे असले, तरीही ही जोडी तुटल्याच्या अनेक वर्षांनंतर आजही या जोडीच्या चर्चा चाहत्यांमध्ये होत असतात. नुकतेच सलमानची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. यात तो एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याच्या अभिषेक बच्चनसोबतच्या लग्नाबाबत बोलत होता.

या मुलाखतीत सलमान खानने अभिषेक बच्चनचीदेखील प्रशंसा केली होती. (When Actor Salman Khan Reacts On Aishwarya Rai And Abhishek Bachchan Marriage Says I Want Happy Life For Her)

सलमान खानने व्यक्त केला आनंद
ऐश्वर्या आणि सलमान एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक होते. याव्यतिरिक्त त्यांचे ब्रेकअपदेखील चांगलेच चर्चेत होते. दुसरीकडे नुकतीच सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या या मुलाखतीत तो ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या लग्नाबाबत चर्चा केली होती. त्याने सांगितले होते की, ऐश्वर्याचे लग्न अभिषेक बच्चनसोबत होत असल्यामुळे तो खुश आहे.

अभिषेक बच्चनची प्रशंसा
या मुलाखतीत सलमानने अभिषेकची प्रशंसा करताना म्हटले होते की, तो एक खूपच चांगला माणूस आहे आणि चांगल्या परिवारातील आहे.

सलमान म्हणाला होता, “मला तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट हवी आहे ती म्हणजे, सुखकर आयुष्य.” आता सलमान आणि ऐश्वर्या दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सलमान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर अधिक चर्चा करणे पसंत करत नाही. मात्र, तो त्या कलाकारांपैकी एक आहे, जो चाहते आणि मीडियासोबत मोकळेपणाने चर्चा बोलत असतो.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल, २००७ रोजी लगीनगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव आराध्या आहे.

सलमान आणि ऐश्वर्याच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा