‘काल मित्राचा कॉल आला, स्ट्रेसमधे होता…’, त्रासात असलेल्या मित्राला संतोष जुवेकरचा बहूमोल सल्ला


आयुष्य हे सुख- दुःखाचं संगम आहे. या जगात आपल्यासोबत अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. कधी कधी आयुष्यात वाईट गोष्टीची भर इतकी वाढते की, त्यातून सावरणे आपणास कठीण, जवळजवळ अशक्यच वाटू लागते. काय करावं सुचत नाही. त्यावेळी गरज असते ते कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घ्यावी याची. त्यावेळी कोणाकडून तरी योग्य मार्गदर्शन मिळणं खरंच खूप गरजेचं असतं. असंच काहीसं घडलंय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर याच्या मित्रासोबत. मात्र या कठीण काळात अभिनेत्याने मित्राला जो सल्ला दिला आणि जे मार्गदर्शन केलं…ते खरंच बहुमोल आहे.

नुकतीच संतोष जुवेकरने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो त्या मित्राबद्दल बोलला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “माझ्या मित्राचा काल कॉल आला. स्ट्रेसमधे होता, खूप बोल्ला खूप….त्रासात होता बऱ्याचशा बाबतीत. मी त्याची फार काही मदत करू शकत नाही, हे त्यालाही आणि मलाही माहीत होतं. पण तरी तो बोलत होता, सांगत होता आणि मी त्याला त्यावेळेला फक्त बोलू देत होतो आणि ऐकत होतो.”

आपल्या पोस्टमध्ये संतोषने पुढं लिहिलं, “तो खूप साचलेला, आतून तो आता मोकळा होत होता. मी शेवटी त्याला एवढंच म्हणालो, मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुंवेमे उडाता चला गया!!!!! अरे……..हाय काय…… नाय काय….!!! जरा जरी स्ट्रेस आल्यासारखं वाटलं, उगाचच आता नको असलेल्या आणि आता आपल्या सोबत नसलेल्या व्यक्तीची आठवण आली आणि आता कसं होणार, काय करू आता मी?……. असे चु……. टिक विचार आले की, असं कुठेतरी मोकळ्या जागी आणि मोकळ्या आभाळाखाली जाऊन बसायचं. एक छान स्वतःचा हक्काचा श्वास घ्यायचा आणि हळू हळू सोडत वर त्या मोकळ्या आभाळा कडे बघत बसायचं. मग जाणवत रिकामं आणि मोकळं असण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. होऊन जाऊदे…… चांग भलं!!!!” (santosh juvekar guided his stressed friend see viral post)

अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून सर्वत्र त्याचं कौतुक केलं जातंय. त्याचं बहुमोल मार्गदर्शन त्याच्या मित्राला कुठेतरी उपयोगी पडेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संतोष जुवेकरने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शिवाय तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. याठिकाणी पोस्ट शेअर करून, तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. बऱ्याचदा अभिनेत्याचे फोटो व्हायरलही होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केआरकेवर एका फिटनेस मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप; मुंबईमध्ये झाली तक्रार दाखल

-‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा

-‘त्यांना मला नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये बघायला आवडते’, करीनाने सांगितले सासू शर्मिला टागोरसोबतच्या बॉन्डबद्दल


Leave A Reply

Your email address will not be published.