‘ही मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या अस्सल अभिनयाने आणि वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. आपल्या वडिलांच्याच पावलांवर पाऊल टाकत त्यांचा मुलगा सनी देओलसुद्धा चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बापलेकांचा चाहतावर्ग कमालीचा आहे. धर्मेंद्र यांनी सनीला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे व अशाच एका किस्स्याची आठवण धर्मेंद्र यांनी शेअर केली आहे.
चित्रपट डब करून जेव्हा ते घरी आले…
सनी देओलने आपला पहिला चित्रपट ‘बेताब’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंग होती. या चित्रपटात सनीला तयार करण्यासाठी धर्मेंद्र यांनी खूप मशागत केली होती. एकदा सनी आपल्या पहिल्या चित्रपटाचे डबिंग करून घरी आला, त्या वेळी तो डबिंग प्रोमो बघून धर्मेंद्र रागाने लाल झाले. त्याचवेळी धर्मेंद्र यांनी सनीला बोलून सांगितले की, “तुझं डबिंग प्रचंड खराब आहे व त्यावर अजिबात मेहनत केली नाही.” त्यानंतर रात्रीच्या वेळी धर्मेंद्र सनीला घेऊन डबिंग स्टुडिओमध्ये गेले. (When He Man Dharmendra Got Angry After Watched Sunny Deol’s First Film Promo)
रात्रभर बसून पुन्हा करून घेतली डबिंग
धर्मेंद्र यांनी हा किस्सा ‘यमला पगला दीवाना’च्या प्रमोशनवेळी सांगितला होता. धर्मेंद्र यांनी सांगितले की, सनीसोबत बसून पुन्हा डबिंग करून घेतली व त्यानंतर त्यांनी सांगितले की, “तू डबिंग कर मी घरी जातो.”
धर्मेंद्र यांनी सांगितले की, सनीला वाटले की, ते निघून घेऊन गेले. मात्र, ते प्रोजेक्शन रूममध्ये बसून सर्व बघत होते. सनी डबिंग करून थकला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत जे होते, त्यांना त्यांनी सांगितले की, “आपण उद्या पुढील काम करूयात.”
धर्मेंद्र यांनी सांगितले की, हे वाक्य ऐकल्यावर ते रूममधून बाहेर आले व त्यांनी सनीला सांगितले की, “बाळा चित्रपटात काम करणं ही सोपी गोष्ट नाही.” धर्मेंद्र यांनी सांगितले की, सनीने पुन्हा जबरदस्ती डबिंग केली होती.
सनी आणि धर्मेंद्र ही बापलेक जोडी ‘अपने’, ‘यमला पगला दीवाना’, ‘क्षत्रिय’ यांसारख्या चित्रपटात एकत्र झळकली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक
-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे
-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’