Saturday, June 15, 2024

जेव्हा अभिनेत्री बिपाशा बसुच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आर.माधवन, स्वतःच दिली होती प्रेमाची कबुली

हिंदी सिने जगतातील कलाकारांच्या प्रेमप्रकरणाचे तसेच त्यांच्या ब्रेकअपचे अनेक किस्से नेहमीच चाहत्यांना ऐकायला मिळत असतात. असे किस्से जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांनाही नेहमीच उत्सुकता लागलेली असते. कलाकारही अनेकदा त्यांच्या लवलाईफ बद्दल जाहीरपणे कबुली देताना दिसत असतात. अशीच कबुली आर. माधवननेही एका मुलाखतीत दिली आहे. आर. माधवननेही (R.Madhvan) त्याच्या आणि अभिनेत्री बिपाशा बसूच्या (Bipasha Basu) नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

आर. माधवन हा भारतीय सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्याने हिंदी सिने जगतात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता आर माधवनने त्याच्या आणि बिपाशा बसूच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. आर. माधवन आणि बिपाशा बसू यांनी 2012मध्ये जोडी ब्रेकर्स या चित्रपटात एकत्रित काम केले होते. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना आर. माधवनने तो बिपाशाच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली होती.

या मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले होते की, “जेव्हा तुम्ही पडद्यावर एखाद्या व्यक्तीसोबत काम करत असता तेव्हा साहजिकच तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित होता. त्यामुळेच मी सुद्धा बिपाशाकडे आकर्षित झालो होतो. ती एक प्रतिभावान व्यक्ती आहे. ती खुपच सुंदर आणि आकर्षित आहे. मला आमचे सेटवर नाते कसे असेल हे माहित नव्हते. पण बिपाशाने कधीही ती मोठी स्टार असल्याचे मला जाणवू दिले नाही,” त्यामुळेच तिच्याकडे मी आकर्षित झालो.

दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बासूही बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिपाशाने ‘राज’, ‘राज 3’, ‘अलोन’, ‘जिस्म 3’ अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015मध्येच बिपाशा आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हरमध्ये प्रेमाचे नाते तयार झाले. यावेळी ते ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम करत होते. या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तिने अभिनेता जॉन अब्राहमला 10 वर्ष डेट केले होते.(when r madhavan said he was definitely attracted to bipasha basu she is exotically beautiful)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा