कलाकार किंबहुना प्रत्येक सामान्य माणूस जेव्हा त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायला लागतो, तेव्हा तो कितीही म्हणाला तरी त्याला ‘ग’ची बाधा होण्यास सुरुवात होते. हे चूक आहे असेही नाही आणि बरोबर आहे असेही नाही. ही बाधा खूपच नैसर्गिक असते. मात्र त्यापासून स्वतःला दूर ठेवणे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यासाठी हितकारक असते. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार हे बिरुद मिळवणारे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना देखील ‘ही’ बाधा झाली होती. केवळ तीन वर्षात एक दोन नव्हे तब्बल १५ सिनेमे हिट देणाऱ्या राजेश खन्ना यांची त्याकाळात तुफान हवा होती. ज्याच्या त्याचं तोंडी फक्त एक आणि एकच नाव होते, राजेश खन्ना. मागे पुढे सतत फॅन्सचं गराडा असणाऱ्या राजेश खन्ना प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्याला राजेश खन्ना त्यांच्या सिनेमात पाहिजे होते. कारण ते ज्या सिनेमात असणार तो हिट होणारच हे आधीच सर्वांना माहित असायचे. राजेश खन्ना हे नाव ब्रँड बनले होते. कदाचित याचमुळे राजेश खन्ना यांना त्याच्या यशावर थोडाफार तरी गर्व आला होता. याच नादात ते चित्रपांच्या सेटवर उशिरा येऊ लागले. त्यांच्या वागण्यात मोठा फरक पडला होता. याचाच प्रत्यय दिगडसरहक मेहमूद यांना आला, त्यांना राजेश खन्ना यांचा राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात राजेश खन्ना यांच्या कानशिलात लगावली होती. नक्की काय झाले वाचा पूर्ण किस्सा.
भारतीय सिनेमाचे ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी ओळखले जाते. त्यांनी आपल्या हटके अभिनयाने लाखो- कोट्यवधी चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या चित्रपटासाठी चाहते वेडे असायचे. इतकेच नव्हे, तर मुली त्यांच्या नावाचे सिंदूर लावायच्या, तर मुले त्यांच्यासारखी हेअर स्टाईल करायचे. त्यांनी बॉलिवूडमध्ये सलग १५ सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणताही अभिनेता मोडू शकला नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले- वाईट किस्से घडले. त्यातीलच एक किस्सा खूप प्रसिद्ध झाला होता, जेव्हा बॉलिवूडच्या एका दिग्गजाने अभिनेता राजेश खन्ना यांनी जोरदार कानशिलात लगावली होती. राजेश खन्ना यांना एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने चापट मारणे, ही खूप मोठी गोष्ट होती. ही घटना त्यादरम्यान खूपच चर्चेत होती.
राजेश खन्ना यांना चापट मारणारा तो अभिनेता इतर कोणी नाही, तर महमूद हे होते. चित्रपटात अभिनय करण्यासोबतच ते एक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होते. त्यांनी सन १९७९ मध्ये ‘जनता हवालदार’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्यासोबत साईन केला होता. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी मुख्य अभिनेत्री होत्या.
या चित्रपटाची शूटिंग महमूद आपल्या फार्म हाऊसमध्ये करत होते. एके दिवशी महमूद यांच्या मुलाची भेट राजेश खन्ना यांच्यासोबत झाली आणि ते त्यांना ‘हॅलो’ म्हणून निघून गेले. त्यादरम्यान राजेश खन्ना मोठे सुपरस्टार होते. त्यांनी आपल्यासाठी लोकांना वेडे होताना पाहिले होते. अशामध्ये महमूद यांच्या मुलाने फक्त ‘हॅलो’ म्हणून जाणे हे त्यांना आवडले नाही.
मग काय राजेश खन्नाही या गोष्टीवरून नाराज झाले आणि सेटवर उशीरा जाऊ लागले. ते नेहमीच चित्रपटांच्या सेटवर उशीराच जात असायचे. मात्र, त्यांच्यामुळे महमूद यांना चित्रपटाचे शूटिंग करण्यात खूपच अडचण येऊ लागली होती. राजेश खन्ना यांच्यासाठी महमूद यांना तासंतास वाट पाहावी लागायची. कदाचित महमूद यांनीही राजेश खन्ना यांना धडा शिकवण्याचे मनाशी ठरवले असावे. अशाच एका दिवशी महमूद आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही. जेव्हा राजेश खन्ना सेटवर उशीरा पोहोचले, तेव्हा त्यांनी राजेश खन्ना यांना जोरात चापट मारली.
महमूद यांनी म्हटले की, “तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरात. मी चित्रपटासाठी तुम्हाला संपूर्ण पैसे दिले आहेत आणि चित्रपट तुम्हाला पूर्ण करावाच लागेल.” त्या एका चापटीने राजेश खन्ना यांनी काही वेळासाठी त्यांच्या स्टारडम विसरावा लागला होता. यानंतर मात्र ते शूटिंगसाठी सेटवर वेळेवर हजेरी लावू लागले.
हेही वाचा :