कंडोमच्या जाहिरातीत काम केल्याचे सांगितल्यावर ‘अशी’ होती रणवीर सिंगच्या वडिलांची रिऍक्शन


बॉलिवूडमधील सर्वात एनर्जेटिक अभिनेता म्हणून नाव येते ते रणवीर सिंगचे. रणवीर आणि दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल आहे. रणवीरने खूपच कमी काळात त्याच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रणवीर त्याच्या चित्रपटांसोबतच, त्याच्या हटके वेषभूषेमुळे आणि काही आश्चर्यकारक खुलाशांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी देखील रणवीर त्याच्या एका वक्तव्यामुळे चांगला चर्चेत आला आहे.

रणवीरने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि त्याच्या वडिलांबाबत एक खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, “२०१४ साली मी एका कंडोमच्या ब्रँडची जाहिरात केली होती. पुढील अनेक वर्षे मी त्या ब्रँडचा चेहरा होतो. एक दिवस माझ्या वडिलांनी मला विचारले की, मी नेहमी बघतो की सर्व कलाकार जाहिराती करतात आणि यात भरपूर पैसा आहे. तू का नाही करत जाहिरात? यावर मी त्यांना उत्तर देताना म्हटले की, योग्य वेळ आल्यावर नक्कीच करेल. त्यानंतर मी त्यांना मी केलेल्या कंडोमच्या जाहिरातीबद्दल सांगितले.”

रणवीरने पुढे सांगितले होते, “मी म्हणालो की, मी माझी पहिली जाहिरात करत आहे, तेव्हा माझ्या वडिलांनी मला विचारले की, अरे व्वा, कोणती जाहिरात करत आहेस? त्यावर मी म्हणालो, कंडोम. हे ऐकल्यावर माझे वडील म्हणाले, मला विश्वास आहे की, तुला सर्व माहिती आहे तू काय करत आहेस.”

रणवीरने याच मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याने वयाच्या १२ व्या वर्षीच त्याची व्हर्जिनिटी गमावली होती. शिवाय तो म्हणाला होता की, त्याच्याबाबतीत प्रत्येक गोष्ट खूपच लवकर लवकर घडत गेली.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो आगामी काळात ‘सर्कस’, ‘तख्त’,’जयेशभाई जोरदार’ सिनेमात दिसणार आहे. सोबतच रणवीरचा ‘८३’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा सिनेमा कोरोनामुळेच प्रदर्शित होऊ शकला नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.