फक्त एक रुपया! जेव्हा जेनेलिया-रितेशला शगुनच्या नावाखाली मिळाला होता एक रुपया


टेलिव्हिजनवरचा सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे कपिल शर्मा शो. प्रत्येक आठवड्यात या शोमध्ये वेगवेगळे कलाकार बोलावले जातात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन कपिल शर्मा शोच्या टीमकडून केले जाते. बोलावलेल्या पाहुण्याच्या मनोरंजनासाठी कपिलची टीम अतिशय आगळेवेगळे आणि मजेदार स्किट सादर करते.

कपिल शर्मा शोच्या एका भागात मराठमोळा रितेश आणि जेनेलिया ही क्युट जोडी पोहचली होती. यावेळी कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा या जोडीने अनुक्रमे धर्मेंद्र आणि सनी देओल बनत एक धमाल एक्ट सादर केला. ह्या दोघांची वेशभूषा पाहूनच सर्वाना हसू आले. हा पूर्ण ऍक्ट पाहून तर सर्वच जण पोट धरून हसत होते. या दोघांनी एका रिक्षातून स्टेजवर एन्ट्री घेतली. धरमजी म्हणजेच कृष्णा अभिषेक आणि सनी म्हणजे किकू शारदा हे जेनेलियाला बघताच तिला शगुन देण्यावर चर्चा करु लागले होते.

त्यानंतर धरमपाजी (कृष्णा अभिषेक) जेनेलियाला शगुन म्हणून ११ रुपये देतात. हे पाहून सनी देओल (किकू शारदा) त्यांना म्हणतात की, ” तुम्ही त्यांना (जेनेलियाला) ११ रुपये देत आहेत? त्यावर धरमजी म्हणतात, चांगले नाही वाटत ना? आणि रितेशच्या हातातून १० रुपये खेचून घेतात. हे पाहून सर्व जणं जोरजोरात हसायला लागतात. हा संपूर्ण भाग यूटुबवर उपलब्ध असून, हा भाग आतापर्यंत ४४ लाख लोकांनी पहिला आहे.

रितेश आणि जेनेलिया कुल आणि लवली कपल्सपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर देखील दोघांनीच बॉन्डिंग इतकी भारी आहे की नवीन लग्न झालेली जोडपी व प्रियकर-प्रेयसी देखील या प्रेमापुढी फिकी पडतील. या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले असून आज या दोघांना दोन मुलं आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.