भोजपुरी चित्रपटातील ‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंग जवळपास रोज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असते. चाहते तिची स्टाइल आणि एक्सप्रेशनसाठी वेडे आहेत. अक्षराने नुकताच इंस्टाग्रामवर स्वत: चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो आता चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचे मुख्य कारण म्हणजे व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न.
या व्हिडिओमध्ये कोणीतरी अक्षराला विचारत आहे, ‘मॅडम, तुम्ही बिहारी आहात का?’ ज्यावर ती चिडून म्हणते की, ‘तुम्ही पुन्हा तेच तेच विचारून माझं डोकं का खराब करत आहात?’ वास्तविक, या व्हिडिओमध्ये अक्षरा लिप सिंक करत आहे. जो सोशल मीडियावर सर्वांना हसवत आहे.
या व्हिडिओमध्ये जेव्हा अक्षराला विचारले जाते, की मॅडम तुम्ही बिहारी आहात का? तेव्हा ती म्हणते, ‘नाही.’ तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला जातो. ती परत ‘नाही’ म्हणते. सतत हाच प्रश्न विचारल्या गेल्यामुळे अक्षरा चिडून म्हणते, ‘त्याच गोष्टी बोलून कपाळावर का भुंकत आहेस?’ मजेची गोष्ट म्हणजे हे वाक्य ती बिहारी भाषेतच बोलत आहे. त्यामुळे या मजेदार व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये अक्षरा खूपच क्यूट दिसत आहे. यात तिने फुलांची प्रिंट असलेला काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘डोक्यावर भुंकू नका.’ इथेही अभिनेत्रीचे कौतुक करुन चाहते थकलेले नाहीत. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अक्षराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती तिच्या ‘डोली’ चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात रितेश पांडे, रूपा सिंग, नीलिमा सिंग आणि बिपिन सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करण्यात आले होते. त्यात पहिल्या लूकमध्ये भोजपुरी गावाचे दृश्य दिसले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक मंजुल ठाकूर यांनी या चित्रपटाचे वर्णन, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारा चित्रपट, असे केले आहे.
अक्षरा सिंगने अभिनयाव्यतिरिक्त गाण्यातही स्वत: चे नाव कमावले आहे. अक्षरा ही भोजपुरीमधील अशी पहिली गायिका आहे, जिला एकाच वर्षात अनेक दशलक्ष फॉलोअर्सनी फॉलो केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉट अभिनेत्री सनी लिओनीने ‘स्प्लिट्सविला एक्स ३’ शोचा प्रोमो केला शेअर, व्हिडिओत दिसला बोल्ड अंदाज
-आमिर खानच्या मुलीने कापले बॉयफ्रेंडचे केस, फोटो शेअर करत नुपूरने केली मजेशीर अंदाजात तक्रार