हॉट अभिनेत्री सनी लिओनीने ‘स्प्लिट्सविला एक्स ३’ शोचा प्रोमो केला शेअर, व्हिडिओत दिसला बोल्ड अंदाज

Actress Sunny Leone share her new show's promo on social media


सनी लिओनी ही आजकाल तिचा अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी असते. तरीही सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल नेहमीच चाहत्यांना माहिती देत असते. तिने नुकतेच सोशल मीडियावरून तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती सांगितली आहे.

त्यात तिने सांगितले आहे की, ती लवकरच एम टीव्ही वरील ‘स्प्लिटस्‌विला एक्स 3’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी बऱ्याच दिवसापासून या ‘शो ची शूटिंग करण्यात व्यस्त आहे. तिने ‘स्प्लिटसविला एक्स 3’ या शोचा प्रोमो नुकताच शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

सनी लिओनी या व्हिडिओमध्ये देसी अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनी एक घनदाट जंगलात एका नावेवर उभी राहून वेगवेगळ्या पोज देत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले आहे की, “तुम्ही प्रेमाच्या दोन बाजू बघण्यासाठी तयार आहात का?”

हा शो शनिवारपासून सुरू होणार आहे. ती या शोमध्ये ‘रणविजय सिंग’सोबत होस्ट करणार आहे. सनीच्या व्हिडिओची लोकप्रियता तुम्ही यावरूनच लावू शकता की, तिच्या या व्हिडिओला एका तासात 1 लाखापेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सनी लिओनी लवकरच ‘विक्रम भट्ट’ यांच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच ती ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. सनी लिओनीची लोकप्रियता बिग बॉस या शोमध्ये आल्यापासून प्रचंड वाढली.

याव्यतिरिक्त तसेच तिने ‘र‌ईस’ या चित्रपटात ‘लैला’ या गाण्याने खूप धमाल केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री ऐश्वर्याने शेअर केला समुद्र किनाऱ्यावरील भन्नाट फोटो, कॅप्शनमध्ये ‘बराक ओबामा’ यांच्या पत्नीचा उल्लेख

-भेटा मिथुन चक्रवर्तीच्या मुलीला; दिशानीचे स्टायलिश फोटो होतायत व्हायरल

-‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी


Leave A Reply

Your email address will not be published.