आमिर खानच्या मुलीने कापले बॉयफ्रेंडचे केस, फोटो शेअर करत नुपूरने केली मजेशीर अंदाजात तक्रार

Ira Khan's hair cutting photo viral on Instagram


बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी इरा खान ही हेअर स्टायलिश बनली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडचे म्हणजे फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याचे केस कापले आहे. ज्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. नुपूरने या मेकओव्हर सेशनचा एक सेल्फी काढून आपल्या इंस्टाग्राम स्टोरी शेअर केला आहे.

या सेल्फीमध्ये इरा तिच्या मोबाईलमध्ये बघत आहे. या फोटोमध्ये दिसते की, इराने एका हातात कात्री पकडली आहे आणि दुसऱ्या हातात मोबाईल पकडला आहे. या सेल्फीला शेअर करत नुपूरने लिहले आहे की, “मी तुला सांगतोय इरा खान. लक्ष दे.” अशा मस्तीच्या मूडमध्ये त्याने इराची तक्रार केली आहे.

इराने त्याचा या फोटोला तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रिपोस्ट करून नुपूरने केलेल्या तक्रारीला खूप मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. तिने असे म्हटले आहे की, “तू देखील बसून कॅटन खेळत होता.” मागच्याच महिन्यात इराने त्याच्या रिलेशनबद्दल सगळ्यांसमोर खुलासा केला आहे.

‘प्रॉमिस डे’ला तिने अशी पोस्ट केली होती की, “तुला प्रॉमिस करणे ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे.” काही दिवसांनंतर तिने इंस्टाग्रामवर एका आर्टिफिशियल फुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने असे देखील सांगितले की, हे नुपूरने तिच्यासाठी बनवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझे वजन बनले होते राष्ट्रीय मुद्दा’, अभिनेत्री विद्या बालनची वाढत्या वजनावर प्रतिक्रिया, करावा लागला ट्रोलिंगचा सामना

-‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी

-हृदयविकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून ‘हा’ अभिनेता बनलाय माणसातील देवमाणूस


Leave A Reply

Your email address will not be published.