बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) शो ‘लॉक अप’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करत आहे. वादग्रस्त सेलिब्रिटी शोमध्ये त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मने जिंकत आहेत. कंगनाच्या तुरुंगात अनेक प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार थिरकताना दिसत आहेत. पण या सगळ्यात कंगनाचा असा एक कैदी आहे, जो टीव्हीवर नाही, तर सोशल मीडियाच्या जगात मोठं नाव आहे.
जर तुम्ही इंस्टाग्रामवर सक्रिय असाल, तर कंगना रणौतची सर्वात तरुण कैदी अंजली अरोरा खऱ्या आयुष्यात किती ग्लॅमरस आहे, हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा हिने फॅन फॉलोविंगच्या बाबतीत लॉक-अप क्वीन कंगना रणौतलाही मागे टाकले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इंस्टाग्रामवर अंजली अरोराचे ११ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. तर बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतचे ७.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. कंगना रणौतचे फॉलोव्हर्स अंजली अरोरा पेक्षा ४ मिलियन कमी आहेत. आता तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की, कंगनाची कैदी अंजली सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या सेलिब्रिटींशी स्पर्धा करणारी अंजली अरोरा सोशल मीडिया स्टार असण्यासोबतच एक प्रसिद्ध टिक टॉकर देखील आहे. अंजली अनेक हिट पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांमध्ये दिसली आहे. अंजली प्रसिद्ध पंजाबी गायक काकाच्या ‘टेम्पररी प्यार’ या गाण्यातही दिसली आहे. या गाण्यासाठी चाहत्यांमध्ये आजही क्रेझ आहे. या गाण्याला युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, अंजलीला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये खूप रस आहे. अंजलीला छोट्या व्हिडिओंमधून लोकप्रियता मिळू लागली. इंस्टाग्राम रीलपूर्वी अंजली अरोरा टिक टॉकवरही खूप प्रसिद्ध होती. अंजली तिच्या सुंदर दिसण्यासाठी आणि लिप सिंक व्हिडिओंसह हास्यासाठी देखील ओळखली जाते.
पण आता कंगना रणौतची कैदी बनल्यानंतर अंजली मोठी स्टार बनली आहे. मात्र, कंगना रणौतने जजमेंट एपिसोडमध्ये अंजलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सवर आधीच प्रश्न उपस्थित केले होते. कंगना म्हणाली होती की, “मला समजत नाही की तुझे १० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स का आहेत?” यासोबतच कंगनाने अंजलीला तिने फॉलो का करायचं हे सांगण्यास सांगितलं. कंगनाच्या प्रश्नाचे उत्तर अंजलीने काहीही बोलून दिले नाही, तर डान्स परफॉर्मन्सद्वारे दिले. अंजलीने ‘मिमी’ चित्रपटातील परम सुंदरी या गाण्यावर डान्स करून अभिनेत्रीला खूश केले. शोमध्ये अंजली खरोखरच अप्रतिम काम करत आहे.
हेही वाचा –