एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि समाजसेवक म्हणून मुजफ्फर अली हे ओळखले जातात. मुझफ्फर अली एका राजघराण्यातील आहेत. त्यांचे वडील उत्तर प्रदेशातील लखीमपूरजवळील कोतवारचे राजा होते. मुझफ्फर अली यांना त्यांच्या सर्वात प्रसिद्ध ‘उमराव जान’ या चित्रपटासाठी सर्वात जास्त आठवले जाते. या चित्रपटाने प्रदर्शित होताच धमाल केली होती. या चित्रपटानंतर मुझफ्फर अली एका रात्रीत स्टार बनले. ते गुरुवारी (२१ ऑक्टोबर) आपला ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
केली आहेत तीन लग्न
मुझफ्फर यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९४४ मध्ये लखनऊमध्ये झाला. त्यांनी लमनाट कॉलेज, लखनऊ येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आयुष्यात तीन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव गीती सेन होते. त्यांचे दुसरे लग्न सुभाषणी अलीसोबत झाले. पण काही काळानंतर त्यांचा सुभाषणीपासून घटस्फोट झाला होता. त्यांना शाद अली नावाचा मुलगा आहे. शाद अली हा चित्रपट दिग्दर्शक आहे.
मुझफ्फर यांची चित्रपट कारकीर्द खूप चांगली होती. त्यांच्या हिंदी चित्रपट प्रवासासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांना २०१४ मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील रेखा अभिनित ‘उमराव जान’ या चित्रपटासाठी मुझफ्फर हे ओळखले जातात. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांना स्तुती करायला भाग पाडले होते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटाने मुझफ्फर यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवले. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जांनिसार’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली नसेल, पण त्यांच्या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाली.
रेखा यांच्या निवडीचे आहे ‘हे’ खरे कारण
एकदा एका पत्रकाराने मुझफ्फर यांना विचारले की, तुम्ही रेखाला ‘उमराव जान’साठी का निवडले, त्यांनी उत्तर दिले की, “रेखा यांच्या नजरेत एक खास व्यक्तिमत्व आहे, जे ‘उमराव जान’च्या पात्राशी पूर्णपणे जुळते. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून असे वाटले की, त्या या पात्राला पूर्ण न्याय देऊ शकतात. ‘उमराव जान’चे चरित्र असे होते की, एक निरागस मुलगी त्या ठिकाणी कशी येते, पडते आणि अनेक वेळा सांभाळते आणि नंतर एका सर्जनशील प्रक्रियेत प्रवेश करते. तिथल्या वातावरणात तिला आलेला अनुभव, तिचे भाव त्या पात्राच्या चेहऱ्यावर येतात आणि रेखा यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर ती क्षमता होती, जी हे पात्र पूर्ण गांभीर्याने बजावू शकतील. म्हणूनच त्यांना या भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला.”
मुझफ्फर अली यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ हा पहिला चित्रपट केला असला तरी, त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांबद्दल बोलताना ‘उमराव जान’, ‘खिजान’, ‘आगमन’ आणि ‘जांनिसार’ हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल