Friday, March 29, 2024

‘या अभिनेत्रीला पद्मश्री का नाही?’ कविताचा हा प्रश्न म्हणावा की, कंगनासाठी असलेला टोमणा!

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिचे वाद असे एक समीकरणच तयार झाले आहे. तिने भारताविषयी केलेल्या वक्तव्याचा अनेक स्तरांमधून निषेध व्यक्त केला जात आहे. अशात तिला पद्मश्री पुरस्कार दिल्याने अनेक जण तिच्यावर जहरी टीका करत आहेत. यामध्ये आता अभिनेत्री कविता कौशिकने देखील कंगनाला चांगलाच शालजोडा मारला आहे.

कविता कौशिकने नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री प्रियांका चोप्राचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रियांका भारतीय हिंदू धर्मातील परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे. कविताने हे फोटो शेअर करत कॅप्शनमधून कंगनाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्कार का नाही मिळाला? उत्कृष्ट अभिनेत्री, महान व्यक्ती, जागतिक पातळीवर यश मिळवणारी आणि कोणताही झेंडा हातात न घेता भारतीय सभ्यतेचा प्रचार करणारी अभिनेत्री, आणि हो तिने कधीही आपल्यापेक्षा मोठ्या अथवा लहान व्यक्तीचा अपमान केलेला नाही.” कविताने या कॅप्शनमध्ये कंगनाचे नाव घेतले नसले, तरी देखील कंगनासाठी हा शालजोडा होता. (‘Why did Priyanka Chopra not get the Padma Shri?’ Comparing Priyanka Chopra with Kangana Ranaut !)

कंगनाने भारतावर खूप आक्षेपाहार्य वक्तव्यं केली आहेत. “भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले होते. खरा भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला.” असे कंगना काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. यावेळी चार वेगवेगळ्या शहरांतून तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दिल्ली महिला आयोग देखील तिच्या विरोधात उभे राहिले आहे. या आयोगाच्या महिला अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी “तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्यात यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.”, अशी मागणी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. स्वाती यांनी राष्ट्रपतींना या मागणीची एक चिठ्ठी पाठवली. त्यांनी या चिट्ठीमध्ये असे लिहिले आहे की, “कंगनाने तिच्या वक्तव्यामुळे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले भगत सिंग, महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचा ती किती द्वेष करते हे समजते. ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली आहे त्यांचा ती द्वेष करते.”

अभिनेत्री कंगनावर आता अभिनय क्षेत्रातून देखील टीका होताना दिसत आहे. कविता कौशिक याचेच एक उदाहरण आहे. कविताच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास तिने ‘कुटुंब’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर ‘कहानी घर घर की’, ‘कुमकुम- एक प्यारासा बंधन’ अशा हिट मालिकांमध्ये देखील ती झळकली. तिने हिंदीसह पंजाबी भाषिक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा