काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी एक सुंदर अभिनेत्री, डान्सर, अतिशय फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. मात्र अगदी काहीच दिवसात शिल्पाची ही ओळख बदलून ती पॉर्न सिनेमांची निर्मिती करणाऱ्या आणि अटकेत असणाऱ्या उद्योगपतींची राज कुंद्राची बायको म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. तिच्या कामासाठी सुप्रसिद्ध असणारी शिल्पा आता राज कुंद्राच्या कारनाम्यांमुळे कुप्रसिद्ध झाली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यापासून सतत राज आणि शिल्पा चर्चेत आहे. संपूर्ण मीडिया आणि लोकांचे लक्ष फक्त या दोघांवरच आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याचे आणि शिल्पाचे अनेक जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. यात त्यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, कपिल शर्मा शोमधला. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये जेव्हा शिल्पा पाहुणी म्हणून आली होती, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आता एवढ्या वर्षांपासून कपिलला आपण पाहत आहोत, तो शोमध्ये आलेल्या अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करतोच करतो. या शोच्या त्या भागातही तो नेहमीसारखे शिल्पासोबत फ्लर्ट करत होता.

त्यात त्याने अचानक शिल्पाला विचारले, की तिने राज कुंद्राशी लग्न का केले? या प्रश्नावर शिल्पाने दिलेले उत्तर ऐकून कपिल आश्चर्यचकित झाला. ती म्हणाली, “मला आधी कपिल शर्मा भेटला नाही ना, म्हणून मी राज कुंद्रासोबत लग्न केले.” या भागात शिल्पासोबत राज कुंद्रा देखील आला होता. यावेळी या दोघांनी त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाचे गुपितही सांगितले होते.

शिल्पाने ‘बिग ब्रदर’ हा रियॅलिटी शो जिंकल्यामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली होती. ती तिचा परफ्युम ब्रँड S2 च्या प्रमोशनवेळी लंडनमध्ये होती. या प्रमोशनसाठी तिला राजने खूप मदत केली. तेव्हा ते चांगले मित्र बनले, त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या आणि काही काळाने ते प्रेमात पडले. ते दोघं पॅरिसमध्ये डेटवर गेले होते, तिथे एक दिवस जेवत असताना राजने शिल्पाला लग्नाची मागणी घातली. ते जिथे जेवायला गेले होते, ते संपूर्ण हॉटेल राजने खास बुक केले होते. शिल्पासाठी हे सर्व एक सरप्राइज होते. शिल्पाने तिच्या बहिणीच्या सांगण्यावरून लाल ड्रेस घातला होता. प्रपोज करताना राजने शिल्पाला पाच कॅरेट हिऱ्याची अंगठी दिली होती. पुढे या दोघांनी २००९ मध्ये लग्न केले. आज या दोघांना मुलगा वियान आणि मुलगी सामिशा हे दोन मुलं आहेत.
सध्या राज अशील सिनेमांच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या वितरणाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक










