Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने केले ‘हे’ काम, प्रशांत दामले म्हणाले…

मराठी सिनेसृष्टीत जेष्ठ कलाकार आणि नाट्यप्रेमी प्रशांत दामले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळीच छाप सोडली आहे. गेली तीन दशकांहून अधिक काळ ते मराठी चित्रपट, नाटकांमधून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मराठी रंगभूमीवरील खरे महाराज म्हणून देखील प्रशांत दामले यांना ओळखल जाते. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट नाटकांनी रंगभूमीला एक नवीन चकाकी मिळवून दिली.

प्रशांत दामले (Prashant Damle) सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या नाटकांच्या संबंधित पोस्ट आणि विविध विषयांवरील त्यांच असणार मत ते सोशल मीडियावरून मांडत असतात. इतकच नाही तर सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रशांत दामले अनेकदा लाइमलाईट्मधे येत असतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यानी कॅप्शनमध्ये लिहीले की, “काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आम्ही जात होतो. त्यावेळी आमचा चालक प्रवीण याची तब्येत ठिक नव्हती. प्रयोग रात्री साडेबाराला संपल्यावर आम्ही पहाटे 2वाजता मुंबईली निघालो होतो. चालक आजारी असल्यामुळे आम्ही थांबलो, पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. इसको बोलता हैं जिगर”

या व्हिडिओमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) गाडी चालवताना दिसत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतल आहे. नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहीले की, “१ नंबर संकर्षण सर! जो व्यक्ती जमिनीवर राहून काम करतो ना त्यांनाच हे जमत” दुसऱ्या एकाने लिहिल की, “जबरदस्त.”

संकर्षण कऱ्हाडेविषयी बोलायच झाल तर, त्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने चित्रपटांमध्ये देखील काम केल आहे. (With the driver centered, the drive axle did ‘this’ job)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती
महाभारत फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा