Monday, April 15, 2024

महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी तिघींची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे यात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार हे नक्की ! सध्या तरी पोस्टरवरून आपण इतकाच अंदाज बांधू शकतो.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ” आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित
स्ट्रोकमधून बरे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती गेले सुट्टीवर, सुनेने केला फ्लाईटमधील फोटो शेअर

हे देखील वाचा